ठाणे दि १३ : पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासारखा गुरु नाही, गुरूंनी ठरवलं तर या जगात काहीच अशक्य नाही. सलग २ वर्ष त्रंबकेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेला नुकतीच राजे संस्कार प्रतिष्ठानने भेट देऊन त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला.

पुलाचिवाडी, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या अतिशय गुणवंत परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेच्या मागणीनुसार प्रा. संभाजी शेळके यांच्या राजे संस्कार प्रतिष्ठानने आपल्या मावळ्यांसोबत गुरुवार दि १२ जून २०२५ रोजी हजेरी लावली. तेथील पहिली ते चौथीच्या ५० विद्यार्थ्यांना दप्तर आणि लेखन साहित्याचे वाटप केले.यामुळे विध्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
यात आनंद शिंदे, मृदुला शिंदे व संजय इधे यांचा सहभाग होता. या उपक्रमाला प्रा. संभाजी शेळके यांची नेहमीप्रमाणे समाजाप्रती तळमळ जाणवली. आपल्या शैक्षणिक साम्राज्यातून वेळात वेळ काढून साद मिळेल तिथे प्रतिसाद यंदाही दिला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह गुरुजनवर्ग, मुख्याध्यापक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





























