Homeशहरजन्म दाखला घोटाळ्या संदर्भात किरीट सोमय्या यांचा उल्हासनगर महापालिका दौरा : राज्यातील...

जन्म दाखला घोटाळ्या संदर्भात किरीट सोमय्या यांचा उल्हासनगर महापालिका दौरा : राज्यातील इतर १२ महानगरपालिकांमध्येही १५ दिवसात चौकशी

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी ) : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आमदार कुमार आयलानी  आणि भाजप पदाधिकाऱ्यांसह  महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये उघडकीस आलेल्या कथित जन्म दाखला घोटाळ्यासंदर्भात उल्हासनगरच्या महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची शुक्रवारी भेट घेतली. या घोटाळ्याच्या गंभीरतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली.

पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत अंदाजे २०,००० बनावट जन्म दाखले जारी करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी पुढे सांगितले की, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातही अंदाजे २५,००० संशयास्पद आणि बनावट जन्म दाखले जारी करण्यात आल्याचा संशय आहे. महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही जन्म प्रमाणपत्र घोटाळे काढले त्यात ५५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महानगर मध्ये कारवाई होत नाही म्हणून स्वतः मुख्यमंत्री यांनी लक्ष घातले आहे. मुंबईसाठी एसआयटी बनवली आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर १२ महानगरपालिकांमध्येही १५ दिवसात चौकशी केली जाईल. त्यांनी सांगितले की, जन्म दाखला घोटाळा हा केवळ कागदपत्रांमधील फसवणूक नसून, देशाच्या नागरिकत्व प्रणालीचे गंभीर उल्लंघन आहे. अशा प्रकरणांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

महानगरपालिका आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड, प्रशांत पाटील, लाल पंजाबी, संजय सिंह चाचा, टोनी सिरवानी, अर्चना अर्चना करणकाळे, पिंटू भाटीजा, कांचन लुंड, बाळा श्रीखंडे, सतीश मराठे, प्रीती विनोद मखिजा यांच्यासह इतर अनेक नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

आयपीएल कर्णधारपदावर मंथन: ऋषभ पंतचा राजीनामा, हार्दिक पंड्या कदाचित बाहेर

ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (बीसीसीआय/आयपीएल फोटो) IPL-2026 अजून संपलेला नाही, पण फ्रँचायझींकडे डोके आधीच सुरू झाले आहेत ज्यांनी यावर्षी विनाशकारी कामगिरी केली....

मुंबईच्या जॉगर्स पार्कच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त मेमरी लेनवर फिरणे

1990 मध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते मुंबई: समुद्राची झुळूक ओळखीची होती, वॉकिंग ट्रॅक उत्साहात बदलला...

पुणे-पिंपरी चिंचवड हूच शोकांतिका: आरोपीने मिथेनॉलसह देशी बनावटीची दारू ऑनलाइन मागवली, असे पोलिसांचे म्हणणे...

दारू विक्रेते कर्नैलसिंग विरका यांचे घर, फुगेवाडी (लि), पिंपरी चिंचवड पोलीस (रा.) यांच्याकडील आरोपी पुणे - फुगेवाडी आणि हडपसर येथील १५ जणांसाठी प्राणघातक...

त्या दिवसाची ग्रीक म्हण: “कपलेले द्राक्ष मधासारखे गोड होते…” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) ग्रीक नीतिसूत्रे त्यांच्या खोल शहाणपणामुळे आणि साधेपणामुळे प्रसिद्ध आहेत. ही नीतिसूत्रे महत्त्वाची सत्ये सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी विविध नैसर्गिक...

error: Content is protected !!