पोलीस पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह भेटलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ताम्हाणे यांचा विशेष सत्कार
उल्हासनगर दि.१ : विविध जाती-धर्मांचे सण-वार,सार्वजनिक उत्सव, विविध पक्षांची आंदोलने, मोर्चे या सर्वांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या, सणासुदिंच्या दिवसांमध्येही स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देऊ शकणाऱ्या आणि जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या उल्हासनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन, लाडू भरवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णू नाथा ताम्हाणे यांना पोलीस पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव, मुस्लिम संघटनेचे मुन्ना भाई, शाबीर शेख, मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलाश वाघ, उप-विभाग अध्यक्ष मुकेश चव्हाण, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, दीपेश धारिवाल,तुकाराम थोरात, मनोज चिंचनकर, नरेश चिकसे, जगदीश माने, रोहित सिंग, संतोष शर्मा, साहिल सय्यद आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






























