अंबरनाथ दि.१ : अंबरनाथ येथील भवानी चौकत नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर आई भवानी मंदिराच्या पवित्र सान्निध्यात संपूर्ण समाजाला जागरूक करण्यासाठी अमली पदार्थ व ड्रग्जविरोधी जनजागृती शपथ सोहळा भव्य उत्साहात पार पडला..

याप्रसंगी शिवसेना युवासेना अंबरनाथ शहर व जय भवानी पारंपरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमास संसदरत्न खासदार .डॉ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या समवेत जय भवानी पारंपारिक सेवा संस्थेच्या अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, जिल्हाप्रमुख .गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख .राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड,.अरुण आशान,नगराध्यक्षा सौ.मनिषा वाळेकर, उपनगराध्यक्ष.राजेंद्र वाळेकर, युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲड.निखिल वाळेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेची शपथ घेतली






























