Homeशहरउल्हासनगरात धीरज आयलानी यांच्या स्मरणार्थ 'चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्राचे...

उल्हासनगरात धीरज आयलानी यांच्या स्मरणार्थ ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्राचे उद्घाटन

  • आमदार कुमार आयलानी यांच्या उपक्रमाचे शहरात कौतुक

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरात धीरज कुमार आयलानी यांच्या स्मरणार्थ, मंगळवारी सेंट्रल हॉस्पिटलजवळील अरुण कुमार वैद्य सभागृहात (टाऊन हॉल) ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्रा’चे भव्य उद्घाटन करण्यात आले. गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.

उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या लोककल्याणकारी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार कुमार आयलानी, माजी महापौर आणि नगरसेविका मीना आयलानी, आरजू धीरज आयलानी आणि बिंदिया आयलानी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले.धार्मिक नेत्यांनी औपचारिक उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पूज्य मधुसूदनजी महाराज यांच्या हस्ते रिबन कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत एमआरआय फक्त १८०० रुपयांमध्ये, सीटी स्कॅन १००० रुपयांमध्ये, रक्त तपासणीवर ४० ते ५० टक्के सवलत आणि औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत .

याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पोलीस उपआयुक्त सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, टीएलआर राजेंद्र लोंढे, महापौर अश्विनी निकम, सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ. मनोहर बनसोडे, उद्योगपती उद्धव रूपचंदानी, महेश अग्रवाल, अनु मनवानी,श्रीकांत गोरे,उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर मान्यवरांसह शहरातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

चार साहिबजादे ट्रस्टच्या वतीने चेअरमन सरदार गुरविंदर सिंग बावा, गुरु नानक खालसा कॉलेजचे प्रतिनिधी, पाटणा साहिब बोर्डाचे सहयोगी सदस्य जसवीर सिंग धाम, श्री गुरु सिंग सभा इंदूरचे अध्यक्ष हरपाल सिंग मोनू भाटिया, मेहर सिंग रंधावा (मुंबई), डॉ. जसवीर कौर मक्कड़ (संचालिका, खालसा कॉलेज मुंबई) आणि डॉ. हरमीत सिंग सलूजा (सीईओ, चार साहिबजादे एमआरआय सेंटर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला आणि उपस्थित असलेल्या सर्वांनी हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन आपल्या ताफ्यात 100 CNG, इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करणार आहे

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) ने यावर्षी नवी मुंबईत ग्रीन फ्लीट उपक्रमांतर्गत 200 CNG आणि इलेक्ट्रिक बसेस आपल्या सार्वजनिक वाहतूक...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

आयपीएल 2026 | ‘गुन्हेगारी निर्णय’: ऋषभ पंतला निकोलस पूरनला सुपर ओव्हरमध्ये केकेआरच्या पराभवाचा सामना...

ऋषभ पंत आणि निकोलस पूरन (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2026 मधील सामना एक...

नातेसंबंधातील ‘वितर्क शैली’ काय आहेत? त्यांना ओळखणे तुमचे बंध कसे मजबूत करू शकतात

डेटिंग ट्रेंड आणि ॲप्सने आधुनिक डेटिंग लँडस्केप पूर्णपणे बदलले आहे. ज्या दिवसांपासून एखाद्याने कबुतराला पत्र पाठवून त्यांचा जोडीदार काय करत आहे याबद्दल...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

error: Content is protected !!