Homeशहरअंबरनाथ नगरपालिकामध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

अंबरनाथ नगरपालिकामध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

अंबरनाथ दि १४ : प्राण रक्षणार्थ सेवा (We Serve to save) या घोष वाक्ये प्रमाणेच अग्निशमन दल आपल्या कर्तव्याची एकनिष्ठ असते. ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी military Air Farce Navy हवा यंत्रणा आहेत. त्याप्रमाणे शहरातील अंतर्गत आग व आपत्ती पासून नागरिकांचे रक्षण करणेसाठी अग्निशमन दल कार्यरत असते. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात एस.एस. कोर्ट स्टिकीन नावाचे जहाज, दारूगोळा व अन्य युध्द साम्रगी घेऊन आले असता. त्यामध्ये भिषण आग लागून मोठ मोठे स्फोट झाले स्फोटांची तीव्रता इतकी भिषण होती की बंदरातून आगीचे गोळे ५०० ते १००० मीटर अंतरावर शहरात फेकले गेल्याने ठिकठिकाणी त्यावेळी आगी लागल्या आणि ज्या जहाजास आग लागली ती आग विझवतांना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी कर्मचारी यांना विरमरण प्राप्त झाले. तसेच अग्निशमनाचे कार्य करतांना हौतात्म्या प्राप्त झालेल्या जवानांना भारत सरकार गृह मंत्रालय यांचे निर्देशानुसार देशातील सर्व अग्निशमन सेवेत १४ एप्रिल हा अग्निशमन दिवस आणि १४ ते २० एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार अंबरनाथ न पा च्या अग्निशमन विभागामार्फत चिंचपाडा मुख्यालयात अग्निशमन सेवा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या हिमाखात पार पडले.

त्यानिर्मित्त या विभागाने शहरात जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावणेत आले. सदर सप्ताहाचे उद्घाटन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण कार्यक्रम मा नगराध्यक्षा सौ. तेजश्री विश्वजीत करंजूले पाटील व मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड यांचे उपस्थित करणेत आली. त्यावेळी अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने व सर्व अग्निशमन कर्मचारी यांनी अग्निशमन सप्ताहाचे महत्व आगीचे धोके आगीचे व्यवस्थापन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे वतीने अग्निशमन रॅलीला हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण शहरात जनजागृती बाबत रॅली काढणेत आली. या रॅलीत सर्व अग्निशमन कर्मचारी ९ अग्निशमन वाहने ४ फायर बुलेट या वाहनांचा समावेश होता. न पा प्रशासनाने अंबरनाथ पूर्व विभागात नव्यानेच Welfare Centre येथे अग्निशमन केंद्र सुरू केले असून पूर्व भागातील आपत्कालीन घटनांवर आता तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. तसेच अंबरनाथ बदलापूर शहराच्या मधोमध मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपयावर असून लवकरच ते केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.

अग्निशमन प्रमुख यांनी यापूर्वी बदलापूर न पा मध्ये कार्यरत असतांना पूर्व व पश्चिम विभागात प्रत्येकी एक असे २ केंद्राची सुरूवात प्रशासनाच्या मदतीने केली आहे. त्यानंतर अंबरनाथ येथे नियुक्ती झाल्यावर विविध योजनातून शासनाकडून निधी प्राप्त करून अंबरनाथ चिंचपाडा (प) येथे अद्यावत केंद्र सुरू केले असून पूर्वेस Welfare Centre येथे दुसरे केंद्र सुरू केले तसेच के. बी. रोड लोटस तलाव कॉर्नर वरील असे केंद्र एकुण ३ अग्निशमन केंद्र व यापूर्वी कुळगांव बदलापूर येथे २ केंद्र असे एकुण ५ अग्निशमन केंद्राची निर्मिती करणेस अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने यांना यश आले.आणि अग्निशमन सेवेला सक्षम व बळकट करणेसाठी दोन्ही न पा प्रशासनाने वेळोवेळी घेतलेली दखल यामुळे घ्या गोष्टी शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेदिवस शहराचा विकास अत्यंत झपाटयाने होत असून त्यामध्ये उंच इमारतींचा अधिक समावेश आहे. त्यामुळे विकासाबरोबरच आपत्कालीन घटनामध्ये होणारी वाढ विचारात घेता न पा ची अग्निशमन सेवा अधिक सक्षम व बळकट करणेत आली असल्याचे त्यांनी सांगितले

महाराष्ट्र शासन अग्निशमन संचालनालयाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधि. २००६ (सुधारित २०२३) नियम २००९ संपूर्ण राज्यात लागू केलेले असून त्या कादयानुसार रहिवासी (उंच इमारती), शैक्षणिक इस्टीट्युशनल असेंब्ली, बिझनेस मर्केटाइल, इंडस्ट्रिज, स्टोरेज, हजार्डस या आस्थापना धारकांना /भोगवटाधारकानी / मालकांनी आपल्या जागेचे २ वर्षातून एकदा Fire Audit करणे व Fire Audit नुसार अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नमुना ब प्रमाणपत्र अग्निशमन विभागात सादर करणे बंधनकारक असल्याचे सोनोने यांनी स्पष्ट केले तसेच वरील सर्व आस्थापनामध्ये यापूर्वी जानेवारी व जुलै महिन्यात अग्निशमन यंत्रणा तपासणी करून घेणे यंत्रणा कार्यन्विन असल्याचे नमुना ब प्रमाणपत्र सादर करणे कायन्याने बंधनकारक आहे. तरी सर्व शहरवाशीयांनी ही नोंद घ्यावी. अंबरनाथ पश्चिम विभागात आग किंवा अन्य आपत्ती उद्भवल्यास चिंचपाडा मुख्यालयात ८९८३९५२४०२ या क्रमांकावर आणि पूर्व विभागात आग किंवा अन्य आपत्ती उद्भवल्यास ८१४९१०५४४२ वेल्फेअर केंद्र या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने यांनी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त सर्व नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नातेसंबंधातील ‘वितर्क शैली’ काय आहेत? त्यांना ओळखणे तुमचे बंध कसे मजबूत करू शकतात

डेटिंग ट्रेंड आणि ॲप्सने आधुनिक डेटिंग लँडस्केप पूर्णपणे बदलले आहे. ज्या दिवसांपासून एखाद्याने कबुतराला पत्र पाठवून त्यांचा जोडीदार काय करत आहे याबद्दल...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

महाराष्ट्र: फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग-2026 9 मे आणि 10 मे रोजी 10 लाख रुपयांच्या...

नवी मुंबई: फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग-2026 (BSL) लाँच करून महाराष्ट्रातील बॅडमिंटन एका नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे, ही एक फ्रँचायझी-आधारित लीग आहे...

बावधनमधील सात रस्ते गुदमरलेल्या अंडरपासकडे जातात

पुणे : बावधनमधील ओंकार गार्डन चौक अंडरपास येथे सात रस्ते, वाहतुकीचा खोळंबा.ट्रॅफिक सिग्नल नसणे आणि घटनास्थळी काही दिवसांपासून पोलिसांची उपस्थिती नसणे ही आणखी गुंतागुंतीची...

IPL 2026: सुनील नरेन जादू आणि रिंकू सिंग फायरपॉवरने KKR साठी सुपर ओव्हर चोरीवर...

सुनील नरेन आणि रिंकू सिंग (एजन्सी इमेज) रविवारी लखनौ येथे दोन्ही संघांनी 155 धावांवर बरोबरी साधल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सुपर...

error: Content is protected !!