Homeशहरउल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सामाजिक उपक्रमास शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे मनोबल वाढविले. रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे त्यांनी कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे सांगितले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत साईनाथ सेवा समिती पालखी परिवाराने कौतुकास्पद उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समितीचे अभिनंदन केले.

याप्रसंगी युवासेना कल्याण लोकसभा सचिव विकी भुल्लर, उत्तर भारतीय शहर संघटक के. डी. तिवारी, उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख प्रमोद पांडे, विनोद सालेकर, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख तुषार बांदल, विभाग संघटक आदेश पाटील, उपविभागप्रमुख विल्सन डिसोजा, समीर सय्यद, विशाल आंबेकर, शाखाप्रमुख मुकेश जाधव, सुनील शिरसाट, मुकेश देसाई यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या आयोजनातून समाजसेवेचा संदेश देत “रक्तदान हेच श्रेष्ठ दान!” ही भावना अधोरेखित करण्यात आली. सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या साईनाथ सेवा समिती पालखी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या आगामी सामाजिक उपक्रमांसाठी उपस्थितांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

रस्ता सुरक्षा अभियानातून हेल्मेट वापराचा संदेश ; पत्रकारांच्या माध्यमातून जनजागृती : उल्हासनगर वाहतूक उपविभागाचा...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागांतर्गत...

error: Content is protected !!