उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी ) : १ जुलै २०२६ रोजी उल्हासनगर येथे अमराठी व हिंदी भाषिक रिक्षाचालक आणि रिक्षामालक बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात अधिक प्रभावीपणे वापरली जावी आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रेरणेने तसेच खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. रिक्शा युनियन अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये सुमारे ५०० रिक्षाचालक व रिक्षामालक बांधवांनी प्रवेश घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





























