उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे थकबाकी प्रलंबित असल्याने याशिवाय त्यांना वारंवार विनंती करूनही मालमत्ता कराची भरणा करत नसल्याने आता उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कराची प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे उल्हासनगर महापालिकेचे कर निर्धारक व संकलक नीलम चंद्रकांत कदम यांनी दिली आहे

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराची मागणी नुसार वसुलीचे प्रमाण खुपच कमी प्रमाणात आहे. मालमत्ता कर धारकांना विविध माध्यमांव्दारे जाहिर आवाहन, सूट देणेकामी विविध योजना यांचा अवलंब करुन देखिल नागरीकांचा मालमत्ता कराचा भरणा करणेबाबत कल दिसुन येत नाही. त्यामुळे महापालिकेस अपेक्षित असलेल्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ दिसुन येत नाही. उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता विभाग करापोटी मोठया प्रमाणावर थकबाकी प्रलंबित असल्याने मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड संस्था यांना उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर विभागातील वर्षानुवर्षे थकबाकीचा भरणा करत नसलेल्या करदात्यांना दुरध्वनीव्दारे कराचा भरणा करणेसाठी संपर्क साधणे, करदात्यांना मालमत्ता कर भरण्याच्या सर्व संभाव्य पध्दती आणि मालमत्ता कर कसा अदा करावा याबद्दलचे मार्गदर्शन करणे, मालमत्ता कराचा भरणा करु शकतील अशी संभाव्य तारखेला भेट देवून रक्कम जमा करणे, मालमत्ता कराचा भरणा अयशस्वी झाल्यास त्याबाबतचे फॉलोअपसाठी कॉल बॅक करणे इत्यादी कामकाजासाठी मालमत्तांच्या कराची वसुलीकामी नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी मे.आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड संस्था हि या मोबाईल क्रमांकावरुन (1)7030054808 (2)7218048302 (3)7350358426 (4)8308014403 (5) 8408002563 नागरिकांना कॉल करुन मार्गदर्शन करणार आहे. नागरीकांनी संबंधित कॉलवर सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करावे असे आव्हान उल्हासनगर महानगरपालिका कर निर्धारक व संकलक निलम चंद्रकांत कदम यांनी केले आहे.





























