Homeशहरउल्हासनगर शहर हा “Danger Zone”म्हणून काँग्रेसच्या वतीने जाहीर व जन जागृती अभियान

उल्हासनगर शहर हा “Danger Zone”म्हणून काँग्रेसच्या वतीने जाहीर व जन जागृती अभियान

उल्हासनगर दि.२५ : उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या जीव घेण्या खड्यां मुळे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्राला डेंजर झोन ( संकट क्षेत्र ) असल्याचे घोषणा व जन जागृती अभियान आज उल्हासनगर कांग्रेसच्या वतीने करण्यात आली. ह्या अंतर्गत टाउन हॉल रोड , उल्हासनगर – ३ येथे सर्व प्रथम त्या रस्त्यावरील खड्यांना ऑइल पैंट नी सीमांकन केले व त्त्या रस्त्या मधील खड्यांची गणना केली, जेणेकरून वाहन चालकाना ते खड्डे स्पष्ट दिसतील आणि नागरिक अपघात टाळू शकतील, त्याच सोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात सूचना फलक घेऊन रस्त्याच्या चारी बाजूला उभे झाले ज्या मध्ये “ संकट क्षेत्र , उल्हासनगर महानगरपालिका हद्द सुरू  “Danger Zone  Enter at your own risk “ अपने सेहत और गाड़ियो का ख्याल ख़ुद रखें , कोई भी नुक़सान के लिए उल्हासनगर महानगरपालिका ज़िम्मेदार नहीं”. असह्य प्रकार च्या सूचना दिल्या होत्या.

पत्रकारांशी बोलताना जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी माहिती दिली की मागील अनेक वर्षान पासून उल्हासनगर कांग्रेसच्या वतीने खराब रस्त्यां विरोधात अनेक आंदोलने केली. ज्या मध्ये “डांबर खाते कोण “,झंडू बाम वाटप , सीमेंट दान आंदोलन अश्या विविध आंदोलनांचा समावेश आहे , आणि मे महिन्यात मोठे धरणे आंदोलन नेताजी चौकात येथे करण्यात आले,त्याचा उद्दिष्ट हाच होता की , पावसाळ्या आधी चांगल्या दर्जाचे रस्ते दुरुस्त करण्यात यावे जेणेकरून ऐन गणेशोत्सव , नवरात्री मध्ये नागरिकांना त्रास होणार नाही , परंतु प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्या मुळेच आज लोकांचे हाल होतं आहेत , एवढेच नव्हे तर काही लोकांनी आपला हयात जीव गमावला आहे , ज्येष्ठ नागरिकांना मणक्याच्या , महिलांना व सर्वच नागरिकांना विविध दुखापत झाले , रिक्षा चालक व वाहन चालक ह्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले. तरी देखील प्रशासनाने ह्या विषय कडे गांभीर्याने लक्ष नाही दिले. अनेक स्थानिक संगीतकारांनी ह्या वर गाणे बनवले , जे राज्य भर प्रचंड प्रसिद्ध झालेत तरी देखील प्रशासनाला ह्याची लाज वाटली नाही म्हणून काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षाची भूमिका निभावत प्रशासनाला जागे करण्यासाठी हे जण जागृती अभियान राबवले.

भारतीय जनता पार्टी आणि शिव सेना ह्या महानगरपालिका अनेक वर्षान पासून सत्तेत आहे व आज प्रशासकीय राज वाटीत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे परंतु त्यांच्या पक्षाचे नेते व आमदार मूलभूत सुविधा इथल्या नागरिकांना पुरवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत व ते फक्त गटबंधन करण्यात व्यस्त आहेत. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेत जनता ह्या गोष्टीचा बदला जरूर घेईल असल्याचे विश्वास रोहित साळवे ह्यांनी व्यक्त केले.

ह्या वेळी ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा,प्रदेश सचिव कुलदीप ऐलसिंहनी ,उपाध्यक्ष राजेश फक्के ,बापू पगारे ,फामिदा सय्यद ,उषा गिरी , ईश्वर जागियाशी, सेल अध्यक्ष संतोष मिंडे, विशाल सोनवणे,पवन मिराणी,जयेश जाधव ,वामदेव भोयर ,विद्यार्थी अध्यक्ष रोहित ओव्हल , देव आठवले, राजकुमारी नारा ,दीपक गायकवाड, रणजीत साळवे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2027 विश्वचषकापूर्वी अक्षर पटेल भारताचा एकदिवसीय फिरकी स्टार म्हणून उदयास आला

बर्मिंगहॅम येथे मंगळवारी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेलचा सामना जिंकणारा अष्टपैलू प्रदर्शन त्याच्या नाबाद 57 आणि 4/62 च्या आकड्यांपेक्षा कितीतरी...

मुंबईत चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराच्या धडकेत ८ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी

मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथे चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत आठ वर्षीय शाळकरी...

सिया गोयल यांच्या कुटुंबीयांना पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले पुणे बातम्या

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सिया गोयलच्या कुटुंबाच्या मालकीच्या मसाला आणि सुक्या मेव्याच्या दुकानाची ऑर्डर दिली आहे. पुणे: महाराष्ट्र अन्न आणि औषध...

पहिल्या मानवी संस्कृतीने विजेचा शोध लावला का? व्होल्टाने बॅटरीचा शोध लावण्यापूर्वी 2,000 वर्षे जुनी...

बगदादजवळ सापडलेल्या एका प्राचीन कलाकृतीने त्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल वादाला तोंड फोडले आहे. संशोधकांनी असे सुचवले आहे की ही जगातील पहिली बॅटरी असू शकते...

डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार | पुणे बातम्या

पुणे : मध्य रेल्वेने (CR) दक्षिण पूर्व घाट विभागात कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा दुसरा रेल्वे मार्ग पूर्ववत केला आहे, ज्यामुळे गुरुवारपासून डेक्कन...

error: Content is protected !!