Homeशहरउल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आले आहे. सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या तसेच प्रतिबंधित ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संबंधित बँक खात्यांविरोधात देशभरातून तब्बल ९६ सायबर पोर्टल तक्रारी दाखल असल्याचे समोर आले आहे. दिल्ली, पंजाब, ओडिशा, महाराष्ट्र यांसह विविध राज्यांमध्ये या खात्यांचा वापर करून सायबर फसवणूक केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. उल्हासनगर गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सुरू असलेला सायबर फसवणुकीचा सेटअप उध्वस्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि बँकिंगशी संबंधित साहित्य जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ लॅपटॉप, २१ मोबाईल फोन, २३ सिमकार्ड, १५५ एटीएम कार्ड, १०५ बँक पासबुक व चेकबुक तसेच ७४ हजार ३५० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांना संबंधित बँक खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांतील आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे आढळून आले. या खात्यांशी संबंधित ९६ तक्रारी राष्ट्रीय सायबर पोर्टलवर नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.या खात्यांमधून एकूण ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. विविध राज्यांमध्ये घडलेल्या सायबर गुन्ह्यांतील रक्कम या खात्यांमधून वळवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीने सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्यासोबतच प्रतिबंधित ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगच्या आर्थिक व्यवहारांसाठीही या खात्यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉप, सिमकार्ड, एटीएम कार्ड, पासबुक आणि चेकबुकच्या माध्यमातून या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके काम करत आहेत. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती तसेच बँक खात्यांच्या व्यवहारांचा तपास केला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा घटक – ४ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. देशभरातील सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी या टोळीचे आणखी धागेदोरे जोडलेले आहेत का, तसेच या आर्थिक व्यवहारामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

रस्ता सुरक्षा अभियानातून हेल्मेट वापराचा संदेश ; पत्रकारांच्या माध्यमातून जनजागृती : उल्हासनगर वाहतूक उपविभागाचा...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागांतर्गत...

error: Content is protected !!