अंबरनाथ दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील काही विभागांमध्ये होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत नागरिक हैराण झाले आहेत. त्यांनी या समस्या बाबत आमदार बालाजी किणीकर यांना सांगितले. किणीकर यांनी त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी मिलिंद देशपांडे व अभियंता शेकाकोरे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी अनियमित पाणीपुरवठ्याबाबत त्यांना जाब विचारत, वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता पाहता पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
तसेच, आमदार बालाजी किणीकर यांनी ‘अमृत टप्पा २’ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना पाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.





























