Homeशहरशालेय शिक्षणात तिसरी भाषा सक्तीची या शासन निर्णयाची उल्हासनगरात मनसे कडून होळी

शालेय शिक्षणात तिसरी भाषा सक्तीची या शासन निर्णयाची उल्हासनगरात मनसे कडून होळी

उल्हासनगर दि १८ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील हिंदी सक्तीला आक्रमकपणे विरोध केला. यानंतर राज्यातील अनेक भागातील मनसैनिक हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान उल्हासनगरात देखील मनसैनिकांनी आक्रमक होत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी केली. त्यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात मनसैनिकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. आपल्या राज्यातील राज्यकर्ते हे दिल्ली समोर नतमस्तक झालेले आहेत आणि त्यामुळे मराठीची गळचेपी करण्यासाठी तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. दरम्यान ही सक्त  मागे घेतले नाही तर आणखीन उग्र आंदोलन करण्याचा इशारा मानसैनिकांनी दिला

महाराष्ट्र शासनाने  १७/०६/२०२५ रोजी शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण – २०२५ / प्र.क्र. ९४/एस.डी.-४ दिनांक १६ एप्रिल २०२५ शासन शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रच्या शिक्षण विभागाला किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ३ ऱ्या भाषेची खरंच गरज आहे का. याचा विचार सरकार करतांना दिसत नाही. फक्त दिल्ली हुन आदेश आला म्हणून महाराष्ट्रातील १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच काम सरकार करत आहे असा आरोप करीत प्रांत कार्यालया बाहेर या शासन आदेशाची उल्हासनगर मनसे कडून होळी करून प्रांतअधिकारी ( SDO) विजयानंद शर्मा यांना निवेदन देण्यात आल.

मनसेने सांगितले जर जबरदस्तीने हा शासन निर्णय लागू करून विद्यार्थ्यांनवर तिसरी भाषा लादली जाणार असेल, तर हे खपवून घेतलं जाणार नाही. “महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही. त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. हा शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा मनसे कडून देण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के,प्रदीप गोडसे,शहर अध्यक्ष संजय घुगे,मनविसे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड,मनसेचे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश शेटपालांनी,रवी पाल,शैलेश पांडव वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात,रस्ते आस्थापनाचे मैनऊद्दीन शेख,विभाग अध्यक्ष देवा तायडे,अक्षय ठाकूर,मोहित बेहराणी, यांच्यासह निलेश शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

फोलारिन बालोगुन: 1930 नंतर विश्वचषकात ब्रेस करणारा पहिला अमेरिकन

युनायटेड स्टेट्सचा फोलारिन बालोगन, उजवीकडे, पॅराग्वेचा ओमर अल्देरेटे पाहत असताना स्कोअर. (एपी फोटो) फोलारिन बालोगुनकडे निवडण्यासाठी तीन देश होते. लॉस एंजेलिसमध्ये शुक्रवारी रात्री,...

जुहूच्या आगीनंतर अंधेरी पश्चिम अग्निशमन यंत्रणेची मागणी नव्याने सुरू झाली आहे

मुंबई: जुहू येथील निवासी इमारतीच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याच्या एका दिवसानंतर, भाजपचे नगरसेवक रूपेश सावरकर यांनी लिंक रोडवरील चित्रकूट मैदानावर अग्निशमन...

दुबई कनेक्शनसह ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला; पिस्तूल, काडतुसे जप्त

पुणे : हडपसर आणि मुंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर येथील चार ठिकाणी छापे टाकले आणि कॉल सेंटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या...

डेव्हिड हॉकनी मृत्यूची बातमी: डेव्हिड हॉकनी, ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक, ज्यांना राजा चार्ल्स...

प्रसिद्ध ब्रिटीश कलाकार डेव्हिड हॉकनी, त्यांच्या आयकॉनिक स्विमिंग पूल पेंटिंग्स आणि दोलायमान शैलीसाठी प्रसिद्ध, वयाच्या 88 व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. त्यांची कारकीर्द...

error: Content is protected !!