- सुमारे २०० जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप
अंबरनाथ दि १६ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये माजी नगरसेवक/ सभापती स्वप्नील बागुल, ॲड सागर बागुल व प्रतिका बागुल यांनी जेष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती स्वप्नील बागुल यांनी दिली. यावर्षी जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आल्या. एकूण २०० छत्री वाटप करण्यात आल्या, त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्वप्निल बागुल यांचे आभार मानले व राज ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो असे आशीर्वाद दिला. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























