- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
- विद्यार्थ्यांना वह्या तसेच छत्री वाटप
- सुसज्ज वर्ग पाहून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा उत्साह
अंबरनाथ दि १६ : अंबरनाथ पश्चिम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने तसेच मा.उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख यांच्या मागणीतून अंबरनाथ नगरपरिषद संचालित डिजिटल मराठी शाळा क्रमांक १ व १३ तसेच शाळा क्रमांक ११ तामीळ माध्यम ह्या शाळेची भव्य अशी नवीन इमारत बांधण्यात आली असून विद्यार्थ्यांना सोयीस्कर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून शिक्षण मिळेल ह्या हेतूने शाळेचे काम करण्यात आले आहे .

सोमवारी १६ जून रोजी शाळेचा पहिला दिवस लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्या तसेच छत्री वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच शाळेची पटसंख्या वाढण्याकरिता खाजगी शाळेप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा सुसज्ज असे वर्ग तयार करण्यात आले आहेत.

यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ज्ञानवंत व्हा! गुणवंत व्हा!!यशवंत व्हा!!! असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड,मा. नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी,मा. उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख, मा.शहरप्रमुख श्री. श्रीनिवास वाल्मिकी, शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती. जयश्री दायगुडे मॅडम, युवासेना तालुका प्रमुख श्री. शैलेश भोईर, शिवसैनिक श्री.पावन वाळेकर,विधानसभा अध्यक्ष श्री. हेमंत जाधव,सोशल मिडिया अध्यक्ष कु. शुभम जाधव, तसेच शिक्षक गण, अंबरनाथ नगर परिषदचे अधिकारी,पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






























