कल्याण दि १४ (सुनिल इंगळे ) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “निसर्ग मैत्री ग्रुप” कल्याण यांचे वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आंबिवली जैवविविधता उद्यान, आंबिवली (पूर्व) येथे ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण पश्चिम येथील ऍड. शलाका अहिरे, ऍड मीनल इनामदार, ऍड. श्री प्रकाश रासकर, ऍड सुनीता देवरे, ऍड. रंजना म्हात्रे, ऍड. दीपश्री वंटमोरे, ऍड. अनिकेत गुंजाळ, ऍड. निलावती होलमुखे, ऍड. संगीता गोडसे, ऍड. माधुरी जोशी, ऍड. तबस्सुम बैरागदार तसेच इतर मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला .





























