- महिन्यातून एक बैठक घेऊन आणखीन काही समस्या असतील त्या सोडवल्या जातील प्रबंधक यांचे आश्वासन
उल्हासनगर दि १२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्थानकात अनेक समस्या आहेत. या समस्या कोणत्या आहेत. रेल्वे प्रशासन या समस्या सोडवतील का याबाबत उल्हासनगर स्थानकातील प्रबंधक यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसह विविध संस्था तसेच आरपीएफ जीआरपीएफ कर्मचारी देखील उपस्थित होते.
उल्हासनगर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या समस्या अद्याप पर्यंत सोडवण्यात आल्या नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. या समस्या बाबत अनेक तक्रार रेल्वे प्रशासनाकडे केल्या होत्या. पण या कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी उल्हासनगर स्थानक प्रबंधक सबिता नित्यानंद मॅडम यांनी गुरुवारी सकाळी प्रवासी वर्ग सामाजिक क्षेत्रात काम करणारे व विविध संस्थेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ॲड प्रशांत चंदनशिव, मुकेश भाटिया, आकाश मेंजी, उमेश देबनाथ. युवासेनचे सुशील पवार ,रवी वर्मा शिवनेरी, फाउंडेशनचे रवींद्र मिंडे तसेच आर पी एफ जी आर पी एफ कर्मचारी उपस्थित होते
त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकात काय समस्या आहेत. असे जवळपास नऊ समस्याचे निवेदन रेल्वे स्थानकाचे प्रबंधक नित्यानंद मॅडम यांना देण्यात आले. उल्हासनगर रेल्वे स्थानकात १) बंद असलेला सरकत्या जिना त्वरित सुरू करावे.२) स्थानकावर होम गार्ड नाही, RPF चे कर्मचारी ची संख्या वाढविण्या बाबत.३) बंद असलेले शौचालय सुरू करण्या बाबत तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील शौचालय ची साफ सफाई बाबत.४) पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्या बाबत.५) ॲम्ब्युलन्स सुरू करण्या बाबत ६) कचऱ्याचे डब्बे बसवण्या बाबत तसंच सफाई कर्मचारी पूर्ण वेळ उपलब्ध करण्या बाबत.७) प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची उंची वाढविण्या बाबत.८) TC उपलब्ध करून देण्यात बाबत.९) तिकीट खिडकी वेळेत सुरू करण्या बाबत.अशा विविध समस्या आहेत. या सर्व समस्या एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली. त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक नित्यानंद मॅडम यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना दर महिन्यात एकदा बैठक घेण्यात येणार असून ज्या ज्या समस्या असतील त्याची माहिती घेऊन त्यावर काम करण्यात येईल असे आश्वासन दिले. या बैठकीत आरपीएफ, जीआरपीएफ कर्मचारी देखील उपस्थित होते


























