Homeशहरठाणे - बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा –...

ठाणे – बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा – डॉ .जितेंद्र आव्हाड

  • मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात डॉ.जितेंद्र आव्हाड सहभागी

ठाणे दि ८ : – विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल अन् त्यातून नागरिकांना फुफ्फसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना, त्यामुळे ठाणे – बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, अशी नागरिकांसह आपली मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी झगडण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राज्य सरकारचा अंत्यत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाविरोधात नुकतेच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. ठाणे शहरातून बोरीवली १५ मिनीटांत गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी अपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याने आपल्या लढ्याचे नेतृत्व डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी करावे, अशी विनंती करीत स्थानिक नागरिकांकडून कॉसमॉस लाँज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस डॉ.जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते.

डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे. दररोज येथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदुषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसे पाहता, हा छोटा प्रश्न आहे. पण, तो सोडविण्याची सरकारची मानसिकता हवीय. हा लढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, यासाठी मी आग्रह धरणार आहे.

दरम्यान,  बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाका ही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतुक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे येथील हरित पट्टा नष्ट होत आहे.  ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली.

यावेळी रहिवाशांच्या वतीने उमेश अग्रवाल, नितीन सिंह,  पंकज ताम्हाणे, पल्लवी शेठ, मधुरेश सिंह,  दिपक पांडे, स्टीव्ह थॉमस,  विवेक जव्हारकर, रचना वैद्य आदींनी आपली कैफियत मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

error: Content is protected !!