अंबरनाथ दि ६ ( प्रमोद दळवी ) : दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवगंगा नगर मधील व अंबरनाथ मध्ये नागरिकांच्या सहकार्याने मनसेच्या वतीने पहिली ते बारावीच्या पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १५ अशा 30 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकाचे वाटप मनसे कार्यालयात सुरू केले असल्याची माहिती अंबरनाथ मनसे शहर सचिव अविनाश विमल गंगाधर सुरसे यांनी दिली
पुस्तक वाटपाची प्रक्रिया साधारण १५ जून पर्यंत चालणार आहे. अविनाश सुरसे यांनी नागरिकांना विनंती केली आहे की गरजू मुलांसाठी आपल्या मुलांची जुनी शैक्षणिक पुस्तके आम्हाला आणून द्यावीत. व आपल्याला हवी असलेली पुस्तक आमच्याकडून उपलब्ध असल्यास घेऊन जावीत असे सांगितले आहे. मनसेच्या या उपक्रमामुळे गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अविनाश सुरसे हे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून दरवर्षी हा उपक्रम राबवत असतात. आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदाही झाला आहे. समाजसेवेसाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या अविनाश सुरसे यांची संपूर्ण अंबरनाथ शहरात सर्वत्र चर्चा आहे.





























