- कु. प्रियांका सुरेश मोहिते हिचे सर्वत्र कौतुक, अभिनंदनचा वर्षाव
उल्हासनगर दि २ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील राहणारे कु. प्रियंका सुरेश मोहिते ही यूपीएससी २०२४ परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिची महाराष्ट्र कॅडर आय.पी.एस (IPS) पदी निवड झाल्याबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. IPS प्रियंका सुरेश मोहिते यांचा सुभाष टेकडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वराज्य संघटनेच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” पुस्तक, शाल आणि पुषगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

IPS प्रियंका सुरेश मोहिते यांनी सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाचे रक्षणाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडणार असल्याचे सांगितले. तसेच स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड जय गायकवाड यांनी IPS प्रियंका सुरेश मोहिते सारख्या तरुणी बाबासाहेब आणि सावित्रीमाईचे खरे अनुयायी आहेत.

समाजातील तरुणांनी अशा पिढीचा आदर्श घेऊन शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान केले. त्यावेळी सुभाष टेकडीतील उपस्थित नागरिकांनी आयपीएस प्रियंका मोहिते यांचे अभिनंदन करून कौतुक केले.





























