- कलाकार क्षेत्रातही उत्तम कामगिरी
नाशिक दि. ०१ ( प्रमोद दळवी ) : अत्यंत शांत स्वभावाच्या आणि तलक बुद्धीच्या लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड. ना कोणता क्लास, ना कोणता गुरु, ना कोणते शिक्षक आपल्या तलक बुद्धीच्या साह्याने त्या एक उत्कृष्ट लेखिका म्हणून नाशिक मध्ये प्रसिद्ध आहेत. त्या लेखिकेचं नाव आशा भोईर असे आहे. नाशिक जिल्ह्यात ते आपल्या कुटुंबासह राहतात.

याशिवाय आशा भोईर यांना कलेचेही आवड. नाटक क्षेत्रातही दोन पाऊल पुढे. त्यांनी नाटकांमध्ये अनेक उत्तम भूमिका देखील निभावल्या आहेत. याशिवाय अनेक सिरीयल मध्ये देखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. तब्बल गेल्या वीस वर्षापासून त्या कला क्षेत्रात आहेत. त्यांनी आजवर भरपूर लिखाण केले आहेत. अनेक कथा, सिरीयल, वेब सिरीज, हिंदी मराठी भक्ती गीत सुद्धा लिहिले आहेत. ते भक्ती गीत युट्युब वर देखील प्रसारित झाले आहेत. एक पूर्ण हिंदी सिरीयल नवनाथाची देखील त्यांनी लिहून प्रोडूसरला दिली आहे. त्या सिरीयल पासून आशा भोईर या लेखिका म्हणून चांगल्याच नाव रूपाला आल्या. त्यांनी आपल्या कारकिर्र्दीत जीवन एक संघर्ष, नवस केला, चूक माझी होती, एक प्रवास असे नाटक देखील लिहून त्यात देखील महत्त्वाची भूमिका निभावली आहे. याशिवाय मांगीर बाबा नवसाला पावला ही शॉर्ट फिल्म, धोंडीबा ही शॉर्ट फिल्म त्यांनी लिहिले असून तिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. अन्यायाचा प्रतिकार शॉर्ट फिल्म, फिरकी ही वेब सिरीज, गाव माझा वेब सिरीज,मोगरा शॉर्ट फिल्म अशा विविध शॉर्ट फिल्मचे त्यांनी लिखाण केले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कविता कादंबºया पुस्तकात देखील प्रसिद्ध झाले आहेत.

विशेष म्हणजे खळबळ मराठी वेब सिरीजच्या निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांच्या खळबळ चॅनल साठी देखील आशा भोईर यांनी एका पेक्षा एक एपिसोड लिहून दिले आहेत. व आजही त्या खळबळ साठी लिखाण करत आहेत. काही मराठी सिरीयल मध्ये देखील देखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. समाजसेवा करण्यातही त्या अग्रेसर आहेत. गोरगरिबांच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात. आशा भोईर यांनी काही शॉर्ट फिल्मला डायरेक्शन देखील केले आहेत. त्या उत्कृष्ट कलाकार आहेत, चांगल्या लेखिका आहेत, याशिवाय नाटकातही ते उत्तम अभिनय दाखवत असतात. सध्या ते ऑल इन वन असल्याचे बोलले जात आहे. खळबळच्या निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांनी आपल्याला त्यांच्या चायनल साठी काम करण्याची आणि लिखाण करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार प्रकट केले आहे.






























