उल्हासनगर दि २७ : १० वी व १२ वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरीता तसेच अनेक शासकीय कामकाजासाठी शासकीय दाखल्यांची गरज भासत असते आणि ते दाखले मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना तहसील कार्यलयाचे हेलपाटे मारावे लागतात.संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही अतिरिक्त ताण सहन करावा लागतो.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या अति-अवश्यक दाखल्यांसाठी उल्हासनगर -५ या ठिकाणी जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या होणाऱ्या गैरसोयी टाळण्याकरिता,विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांच्या वतीने आज तानाजीनगर,एम.आय.डी.सी रोड उल्हासनगर-१ या ठिकाणी १ दिवशीय शासकीय दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील नागरिकांकडून या महत्वपूर्ण दाखल्यांच्या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, कैलास घोरपडे, शाखा अध्यक्ष दिपेश धारिवाल, संजय नार्वेकर, जगदिश माने,मनोज चिंचनकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.





























