Homeमहाराष्ट्रसहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २० : राज्यातील सहकाराशी निगडीत नागरिकांच्या सोयीसाठी ई-क्युजे (e-Quasi-Judicial) प्रणालीचे मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सहकार विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीमुळे जनतेला जलद तसेच पारदर्शक पद्धतीने सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ई-क्युजे प्रणालीविषयी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,’महाराष्ट्र राज्य सहकारी चळवळीमध्ये देशात अग्रेसर असून राज्यात सुमारे २.२५ लाख सहकारी संस्था आहेत. या संस्थांचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार निबंधकामार्फत करण्यात येते. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाच्या ई-गव्हर्नस धोरणांतर्गत ई-क्युजे प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ई-क्युजे अंतर्गत पारदर्शक पद्धतीने कागदविरहित पुनर्विचार व अपील प्रक्रिया प्रणाली (PRATYAY-Paperless Revision and Appeal in Transparent Way) विकसित करण्यात आली आहे. यामुळे जनतेला सर्व सेवासुविधा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणारआहेत. नागरिकांच्या, पक्षकारांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या वेळेची बचतही यामुळे होणार आहे.

ई-क्युजे प्रणालीच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते.

ई-क्युजे अंतर्गत ऑनलाइन सुविधा

या प्रणालीमध्ये वकील /व्यक्ती /संस्थांची ऑनलाईन नोंदणी, सर्व पक्षकारांची ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन पद्धतीने प्रकरण दाखल करणे, दाखल प्रकरणांची ऑनलाईन छाननी, त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सुविधा, दाखल प्रकरणांच्या सुनावणीच्या तारखा / त्यामधील बदल पक्षकारांना नोटीसा ई-मेल द्वारे बजावण्यात येणार, सुनावणीच्या तारखा व वेळा तसेच बोर्ड पक्षकारांना ऑनलाईन पाहता येणार, सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेता येणार व त्यांना ऑनलाईन रोजनामा उपलब्ध होणार, सर्व पक्षकारांना ऑनलाईन अर्धन्यायिक निर्णय (ई-मेल द्वारे) कळविण्यात येणार आदी सेवांचा यात समावेश आहे. या प्रणाली अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट १९६३ मधील मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विविध कलमाअंतर्गत अर्ज, अपील व पुनरिक्षण अर्ज तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरुद्ध तक्रार अर्ज या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हीसी द्वारे ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नोटीस बजावण्यासाठी ई-टपाल सेवेचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

error: Content is protected !!