Homeशहरविविध नागरिक समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

विविध नागरिक समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि.३० : शहरातील विविध समस्याने नागरिक हैराण झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या महापालिकेच्या निदर्शनास आणण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ०२  मे रोजी सकाळी ११  वाजता उल्हासनगर महानगरपालिकेसमोर शिवसेना नागरिकांसोबत जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा पालिकेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यावेळी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना सद्बुद्धी येण्यासाठी होम हवन देखील करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे.

शहरातील नागरिक विविध समस्याने ग्रासलेले आहेत. त्यात शहरात निर्माण झालेली गंभीर पाणीपुरवठा समस्या, पाणीपट्टी दरामध्ये भरमसाठ वाढ, शहरातील झालेली रस्त्यांची दयनीय अवस्था, शहरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, कोणार्क कंपनीच्या सफाई कंत्राटदाराकडून साफसफाईकडे होणारे दुर्लक्ष, ठेकेदारास भरमसाठ देयक अदा करूनही व्ही. टी.सी मैदान तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत. तरीही ठेकेदारावर कोणतीही कारवाई नाही, शहरातील गार्डन मैदाने सरकारी जागेवर इत्यादी होणारे अतिक्रमण, शहरातील होत असलेल्या रस्त्याचे व भुयारी गटारांची निष्कृष्ट दर्जाची कामे. शहरातील सार्वजनिक शौचालयांशी झालेले दुरावस्था. आधी समस्यांबाबत प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश जन आंदोलन ०२  मे रोजी सकाळी ११  वाजता महापालिकेसमोर आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन धनंजय बोडारे यांनी केले आहे. पालिकेला निवेदन दिल्यानंतर धनंजय बोडारे यांनी पत्रकारांना या जनआक्रोश आंदोलनासंदर्भात माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले गेल्या तीन वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य या राज्यामध्ये या देशांमध्ये असे असताना लोकप्रतिनिधीची निवडणूक गेल्या ३ वर्षांपासून येथे नाही. काही ठिकाणी तर पाच सहा वर्षांपासून नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीयांनी लोकांची कामे तातडीने करणे गरजेचे आहे. उलट त्यांना निरंकुश असते सत्ता. पण गेल्या ३ वर्षांपासून या महापालिकेची परिस्थिती बिघडत चालली आहे. येणारा अधिकारी काही काम करत नाही. आमचा हा अनुभव आहे. मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी समस्या वाढल्या आहेत. अशा दिवसान  दिवस या समस्या वाढतच चालला आहेत.  त्याच्यावर समाधान निघेल की नाही हे सांगता येत नाही. लोकप्रतिनिधी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करूनही ते उचलत नाही. आयुक्त तर लोकांना भेटत सुद्धा नाही. भेटत असतील ते माहित नाही पण माझा अनुभव आहे. वारंवार भेट मागून सुद्धा आयुक्त भेट देत नाही. आम्ही या समस्यांसाठीच आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असतो. असे धनंजय बोडारे म्हणाले. त्यावेळी धनंजय बोराडे यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचा पाढाच वाचला.

नागरिकांना  विनंती केली की २  तारखेला आपला आक्रोश घरी बसून चालणार नाही. नाहीतर मग आपण काही बोलू शकणार नाही. या महापालिकेला घेरावा घालायचा आहे. त्या  ठिकाणी धरणे द्यायचे आहे. या प्रशासनातील मग शासनातील असतील प्रशासनातील असतील लोकांना सद्बुद्धी येण्यासाठी आम्ही होम हवन करणार आहोत सर्वांना विनंती करतो याच्यातून आहुती द्या. आणि या प्रशासनाला जागे करूया, प्रचंड जन आक्रोश महापालिकेसमोर दाखवा. त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाही असे धनंजय बोडारे  म्हणाले त्यावेळी  कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, दिलीप मिश्रा, आदिनाथ पालवे, राजू माने, शिवाजी जावळे, सुरेश पाटील, कुलविंदरसिंह बैस, आधी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्कॅमरना APK फाईल्स तयार करून विकल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधील विज्ञान पदवीधराला अटक केली

मुंबई: डीबी मार्ग पोलिसांनी 26 वर्षीय विज्ञान पदवीधर एसके मंडल याला पश्चिम बंगालमधील फसवणूक करणाऱ्यांना एपीके फाइल्स तयार करून विकल्याच्या आरोपाखाली अटक...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘पहा कोण बोलतंय’: माजी फिफा बॉसने वर्ल्ड कप $20 अब्ज सेलआउट योजनेवर हल्ला केला,...

फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी विश्वचषक गुंतवणूक योजनेवर टीका केली कारण चाहत्यांनी त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला/ प्रतिमा: एपी FIFA चे माजी अध्यक्ष...

स्टीव्ह जॉब्सचे दिवसाचे कोट: “उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर...

स्टीव्ह जॉब्स (फोटो: stevejobsarchieve) स्टीव्ह जॉब्सचे जीवन प्रेरणा घेण्यासारखे आहे; वारंवार धक्के सहन करूनही बळकट कसे परत यायचे आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा...

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

error: Content is protected !!