Homeशहरमेरा युवा भारतच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्ञानगंगा महाविद्यालयाची गौरवशाली कामगिरी

मेरा युवा भारतच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्ञानगंगा महाविद्यालयाची गौरवशाली कामगिरी

ठाणे दि. २८ ( प्रमोद दळवी ) : मेरा युवा भारत (MY Bharat), ठाणे यांच्या वतीने भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या (Ministry of Youth Affairs & Sports) उपक्रमांतर्गत ‘नशामुक्त भारत – विकसित भारत’ या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्ञानगंगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले.

स्पर्धेमध्ये कु. रोशनी विश्वकर्मा हिने नृत्याविष्कार (Solo Dance) स्पर्धेत तृतीय क्रमांक  पटकावला, तर सूरज बारकुंटवाड याने गीतगायन (Singing) स्पर्धेत द्वितीय क्रमांक  मिळवून ज्ञानगंगा महाविद्यालयाचा गौरव वाढविला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “मामाच्या गोव्याला जाऊया” या मराठी चित्रपटाच्या प्रचारासाठी उपस्थित राहिलेले अभिनेते अंकुश चौधरी, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके हे होते. यावेळी सर्व कलाकारांनी ‘नशामुक्त भारत – विकसित भारत’ या अभियानाला पाठिंबा दर्शवत युवकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने नशामुक्त समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कलाकारांनी आपला आगामी मराठमोळा विनोदी चित्रपट “मामाच्या गोव्याला जाऊया” हा ३१ जुलै रोजी प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल डीजीईटी इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील, संचालक व विश्वस्त मा. डॉ. अनिता पाटील मोरे, संचालक व शैक्षणिक सल्लागार मा. श्री. अमित अरविंद मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वंदना शर्मा, ज्ञानगंगा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भाविका करकेरा, जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा. अनिल आठवले, सांस्कृतिक विभागाच्या अश्विनी मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ज्ञानगंगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश महाविद्यालयाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या परंपरेला साजेसे असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थी विकासाच्या ध्येयाची ही आणखी एक अभिमानास्पद नोंद ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

उल्हासनगरातील राजकीय गुरूला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी )  : गुरुपौर्णिमा निमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा आशीर्वाद घेत असतात. उल्हासनगरातील...

error: Content is protected !!