Homeशहरसपना गार्डन पार्किंग परिसरातील जर्जर मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर ; आमदार...

सपना गार्डन पार्किंग परिसरातील जर्जर मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर ; आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर येथील सपना गार्डन परिसरातील पार्किंग क्षेत्राकडे जाणारा मार्ग अनेक दिवसांपासून अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर खड्डे, चिखल आणि पाणी साचत असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. नागरिकांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीची दखल घेत आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नांतून या मार्गाचे सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्यात रूपांतर करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पार्किंग परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सीसी रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांना खड्डे, चिखल आणि पावसाळ्यातील गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही, तसेच नागरिकांना दैनंदिन ये-जा अधिक सोयीस्कर होईल. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार कुमार आयलानी यांचे मनःपूर्वक आभार मानले. या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

स्थानिक नागरिक नरेश मुलचंदानी यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी आमदार कुमार आयलानी यांच्या जनहिताभिमुख कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही अशाच प्रकारे मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. या कामामुळे उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा होऊन नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे वर्णद्वेष नव्हते’: इजिप्तच्या बॉसने शेवटी व्हायरल ‘X’ हावभावावर मौन तोडले आणि मेस्सीला अश्रू...

इजिप्तचा बॉस होसम हसनने त्याच्या व्हायरल 'एक्स' हावभावाचे स्पष्टीकरण दिले, वर्णद्वेषाचे आरोप नाकारले आणि लिओनेल मेस्सीच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल आश्चर्यचकित दावा केला/ प्रतिमा: एपी...

जगण्यासाठी 24 तास, जुळणारा दाता नाही: आईच्या दुर्मिळ यकृत दानाने 26 वर्षीय तरुणाला वाचवले...

मुंबई : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी, 26 वर्षीय कुर्ला रहिवासी विनू (नाव बदलले आहे) हा एक निरोगी तरुण होता ज्याचा विश्वास होता की...

पुण्यात 800 हून अधिक शालेय वाहतूक वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्रे नाहीत

सध्या शाळेच्या बस आणि व्हॅनचा समावेश असलेली ८१२ वाहने फिटनेस कागदपत्राशिवाय विद्यार्थ्यांना नेत आहेत. पुणे : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याहून...

5 लांब केसांच्या कुत्र्यांच्या जाती ज्या त्यांच्या दिसण्याने आणि व्यक्तिमत्वाने मन जिंकतात

रस्त्यावरून चालणारा फुगलेला कुत्रा क्वचितच कोणाच्या लक्षात येत नाही. लोक थांबतात, हसतात, प्रश्न विचारतात आणि काहीवेळा द्रुत चित्रासाठी त्यांचे फोन देखील काढतात. लांब केसांच्या...

पुणे धक्कादायक: 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोबोटिक्स ट्यूटरला अटक

फुटेजमध्ये पुण्यातील घटनेनंतर सार्वजनिक अशांतता आणि आरोपींसोबत शारीरिक संघर्ष दिसून येतो (फोटो क्रेडिट: एक्स) पुणे - १४ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या तपासानंतर पुणे...

error: Content is protected !!