Homeशहरआमदार कुमार आयलानी यांच्या पाठपुराव्याला यश; उल्हासनगरातील १,२७२ प्रलंबित प्रकरणांसाठी मुद्रांक शुल्क...

आमदार कुमार आयलानी यांच्या पाठपुराव्याला यश; उल्हासनगरातील १,२७२ प्रलंबित प्रकरणांसाठी मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

उल्हासनगर  दि. १० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील मुद्रांक शुल्काशी संबंधित १,२७२ प्रलंबित प्रकरणांबाबत आज महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उल्हासनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उल्हासनगरातील नागरिकांना प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, ही योजना पुन्हा लागू करण्यात यावी, अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. आमदार आयलानी यांच्या या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला. बैठकीदरम्यान उल्हासनगरातील १,२७२ प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना जलद आणि सुलभ दिलासा मिळावा, यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याची प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या निर्णयामुळे उल्हासनगरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रकरणांच्या निकाली काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या ऑनलाइन बैठकीस आमदार कुमार आयलानी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक (आयजीआर), पुणे, सह जिल्हा निबंधक (जेडीआर), ठाणे ग्रामीण तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘फक्त लाजिरवाणे’: आरसीबी स्टारने उघड केले की विराट कोहलीचा खाजगी भेटीदरम्यान गुप्तपणे फोटो काढण्यात...

जॉर्डन कॉक्सला विराट कोहलीबद्दल वाईट वाटते (प्रतिमा: एक्स) इंग्लंडचा फलंदाज जॉर्डन कॉक्सने विराट कोहलीला गोपनीयतेच्या अभावाबद्दल निराशा व्यक्त केली आहे आणि लंडनमध्ये शांतपणे...

‘फक्त एक अनौपचारिक संवाद’: एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवारांच्या अचानक भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी...

सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ देत अनौपचारिक गप्पा मारल्या, मीडियाने परिस्थिती अतिशयोक्त केली आहे. मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘माझा मुलगा, नंतर माझे बाबा 20 दिवसांत गमावले’: केतन अग्रवालच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे या प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्याची विनंती केली आहे पुणे: आठवडाभरात आपला मुलगा आणि वडील दोघेही गमावल्याने शोक...

एर्लिंग हॅलँडचा ऑफ-फील्ड फ्लेक्स: 5 कार ज्या वायकिंगच्या कार संग्रहात आहेत

एर्लिंग हॅलंड हा फुटबॉलच्या उल्लेखनीय हंगामाचा आनंद लुटत असून, नॉर्वेला विश्वचषकात नेले आहे. गोल्डन बूट शर्यतीतील अव्वल खेळाडूंशी बरोबरी साधत त्याने सात गोल...

HP राज्यपालांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर | पुणे बातम्या

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता (डावीकडे), आणि एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड पुणे : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर...

error: Content is protected !!