Homeशहरअखेर जिजामाता कॉलनीतील तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पोकलेनने खणला रस्ता: जलमय परिस्थितीत...

अखेर जिजामाता कॉलनीतील तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पोकलेनने खणला रस्ता: जलमय परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला महापौरांची धाव

 उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळपासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील जिजामाता कॉलनीत शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. जलमय परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांनी धाव घेऊन त्या परिसरातील नागरिकांना दिलासा देत घटनास्थळी पोकलेन मशीन मागून घरांमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मध्यरात्रीच रस्त्याचे खोदकाम करून घेऊनत्या ठिकाणावरील जलमय परिस्थिती आटोक्यात आणली. महापौरांच्या या कामगिरीमुळे त्या परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार प्रकट केले आहे

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील जिजामाता कॉलनीतील शेकडो घरांमध्ये मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या  मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. घरातील संसार उपयोगी वस्तू देखील पाण्याखाली आल्याने नागरिक घरातच अडकले होते. पण बुधवारी सायंकाळी महापौर अश्विनी निकम यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम आवश्यक असल्याने त्यासाठी पोकलेन मशीनची गरज असल्याने प्रशासनाने सांगितले. ही समस्या उपमहापौर अमर लुंड यांच्या पॅनल मधील असल्याने त्यांनी स्थानिक रहिवाशांना रात्री एक वाजेपर्यंत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान महापौर अश्विनी निकम यांनी त्वरित महापालिका कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली. अखेर रात्री नऊच्या सुमारास महापौर अश्विनी निकम आणि नगरसेवक दुर्गा राय यांच्या उपस्थितीत पोकलेन मशीन जिजामाता कॉलनीत दाखल झाली. घरांमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने रस्ता खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी काम सुरू असताना नाल्यालगत उभारलेले एक शौचालय कोसळले त्यावेळी महापौर अश्विनी निकम यांनी संबंधित कुटुंबाशी संवाद साधत आवश्यक मदतीची आवाहन दिले.

रस्त्याचे खोदकाम वेगाने सुरू करण्यात आले त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास घरातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री साधारण बारा वाजेपर्यंत बहुतांश घरातील पूर्णपणे बाहेर काढण्यात आले. जिजामाता कॉलनीतील संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत महापौर अश्विनी निकम या घटनास्थळी उपस्थित राहिल्या होत्या. पाण्याचा निचरा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांसोबत चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर देऊन तिथून प्रस्थान केले. नागरिकांना पाण्यात ठेवून हे मला पटत नव्हतं हे काम उद्या देखील होऊ शकला असतं पण ते मला पटणार नव्हतं म्हणून मी लवकरात लवकर त्या ठिकाणी  पोकलेन मशीन मागून काम सुरू केलं असे  महापौर अश्विनी निकम यांनी सांगितले.मंगळवारी मध्यरात्रीपासून जिजामाता कॉलनीत पाणी नागरिकांच्या  घरात तुंबलेले होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणतेच काम झालेलं नव्हतं. पण महापौर अश्विनी निकम यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पोकलेन मशीन मागून त्वरित या ठिकाणी कामाला सुरुवात केल्याने काम पूर्ण झाले. महापौर या नागरिकांच्या मदतीला धावून आल्याने व त्यांच्या  या कामगिरीबद्दल त्या परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार प्रकट केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात अनेक दशकांपासून मतदार आहेत, परंतु 2002 मधील कौटुंबिक दुवा या यादीत सामर्थ्य आहे

बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) साठी फॉर्म घेऊन जातात. पुणे: भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचे विशेष गहन...

आमदार कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयआर समीक्षा बैठक संपन्न : निष्क्रिय बीएलए बदलण्यात...

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रगतीची समीक्षा करण्यासाठी गुरुवार रोजी आमदार कुमार...

उल्हासनगरमध्ये अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण : ५०० हून अधिक रिक्षाचालक व रिक्षामालक बांधवांनी...

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी )  : १  जुलै २०२६  रोजी उल्हासनगर येथे अमराठी व हिंदी भाषिक रिक्षाचालक आणि रिक्षामालक बांधवांसाठी आयोजित करण्यात...

‘जे डिलिव्हरी करतील तेच प्रवास करतील’: 2026 आशियाई खेळ निवड धोरणावर क्रीडा मंत्री

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (ANI फोटो) नवी दिल्ली: क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी स्पष्ट केले की सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 600...

महाराष्ट्रात 1,28,290 प्रलंबित जमीन सर्वेक्षण प्रकरणे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की, राज्यात 1,28,290 जमीन सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित आहेत आणि जमीन सर्वेक्षण अर्ज निकाली...

error: Content is protected !!