उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ) : युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्पेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी , उत्तर भारतीय शहर संघटक केडी तिवारी, उपशहर प्रमुख जयकुमार केणी, कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर (विक्की) सिंह भुल्लर, माजी शिक्षण सभापती.नंदू भोसले, विभागप्रमुख. प्रमोद पांडेय, शाखाप्रमुख सुमित सिंग तसेच अन्य शिवसैनिक व युवासेनेचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.





























