उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी यांनी मागणी केलेल्या उल्हासनगर शहरातील अतिक्रमणे नियमित करणे, सनद मिळण्यास होत असलेल्या अडचणी बाबत बुधवारी ३ जून २०२६ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत मध्ये मंत्री दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शहरातील सर्व अतिक्रमणे नियमित करणे तसेच सनद मिळण्यास होत विलंबाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली होती.

झालेल्या चर्चा मध्ये १) उल्हासनगर शहरातील १ जानेवारी २०११ पूर्वीची झोपडपट्टी, ब्लॉक प्लाट u नंबर इ नंबर चालता नंबर मिळकती असलेले सर्वच अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. २) डी प्रमाणपत्र न घेता थेट जागेची मालकी रेडीरेक्नरच्या केवळ ५% रक्कम भरून अतिक्रमण नियमित होणार आहेत. ३) यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार मोहीम स्वरूपात अतिक्रमणे नियमित होणार आहे. ४) जागेची सनद मिळाल्यानंतर जागा मालक जागेवरील इमारतीबाबत डी फॉर्म घेईल किवा इमारत मोडकळीस आलेली असल्यास नव्याने बांधकाम परवानगी घेऊ शकेल. ५) सनद प्राप्त झाल्यानंतर मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.त्यामुळे उल्हासनगर शहरातील लाखो नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे
या बैठकीला आमदार कुमार आयलानी, महसूल विभाग सह सचिव मनीषा जायभाये, मुद्रांक विभाग सहसचिव श्री इंगळे , कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे ,उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा , नगर रचनाकार श्री विकास बिरारी ,भूमापन अधिकारी राजेंद्र लोंढे तसेच आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.





























