उल्हासनगर दि. ८ : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील दहा चाळ येथील रहिवासी धम्मपाल खडताळे यांचे शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
धम्मपाल खडताळे यांना जवळपास दीड वर्षांपूर्वी पॅरेलेसचा अटॅक आला होता. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना मायनर अटॅक आल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सुभाष टेकडीतील दहाचाळ परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा कुटुंब आहे. सुभाष टेकडीतील ते जुने जाणते रहिवासी होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.त्यांचे अंत्यविधी शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे.





























