मुंबई दि: २ ( प्रमोद दळवी ) : लघुपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा परेल येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जीवनगौरव, रंगकर्मी, कलाभूषण आणि समाजभूषण पुरस्कार देऊन विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. गेल्या २५ वर्ष नाटक, सिनेमा. क्षेत्रात अभिनेता, निर्मिती व्यवस्थापक, कार्यकारी निर्माता, आणि आता समाजसेवक व पत्रकार या भूमिकेत कार्यरत असणाऱ्या गणेश तळेकर यांना “ कलाभूषण पुरस्कार २०२६ ” देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या ०९ एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व VPR प्रॉडक्शन प्रस्तुत ” माझा बाबा “या शॉटफिल्मला सहभागी सन्मान, व प्रबोधनात्मक लघुपट म्हणून दोन पुरस्कार मान्यवर उपस्थित मंडळींचे हस्ते देण्यात आले .

गणेश सुविद्या दत्तात्रय तळेकर हे मूळ मुंबईतील राहणारे असून त्यांचे गाव रत्नागिरी आहे. त्यांनी प्रथमच लेखक / दिग्दर्शित केलेली ०९ एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व VPR प्रॉडक्शन प्रस्तुत ” माझा बाबा “या शॉटफिल्मला अनेक फेस्टिवल मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. ” माझा बाबा ” कथेला, त्यातील अभिनेते सुरेश डाले , सहकलाकार अभिनेते अनिल सुतार यांची नावे पुण्याच्या ११११ शॉटफिल्म मधून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मधे नामांकन प्राप्त झाले म्हणून घेतली गेली आहेत. आर्यरवी एंटरटेनमेंट तर्फे ” माझा बाबा ” या लघुपटला ” प्रबोधनात्मक लघुपट पुरस्कार २०२६ ” व सामाजिक बांधिलकी जपणारा पुरुस्कर देऊन गौरवण्यात आले. त्याच बरोबर ०९ एंटरटेनमेंट व VPR प्रॉडक्शनला आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत लघुचित्रपट महोउत्सवात सहभागी झाल्या बद्दल “सहभागी सन्मान ” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लघुपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञाना आपल्या हक्काचे स्थान नेहमीच मिळवून देणारे आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांचे गणेश तळेकर यांनी मनापासून आभार प्रकट केले.






























