Homeशहरबिहार ब्लास्टर्स ठरला 'प्रेसिडेंट कप - २०२६' पहिला विजेता : दादोजी कोंडदेव...

बिहार ब्लास्टर्स ठरला ‘प्रेसिडेंट कप – २०२६’ पहिला विजेता : दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये दिमाखदार सांगता सोहळा संपन्न

ठाणे दि.६ : टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या सहा दिवसांपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ‘प्रेसिडेंट कप – २०२६’ चा समारोप रविवारी अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्याने झाला. अंतिम फेरीत बिहार ब्लास्टर्स संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत पहिल्यावहिल्या ‘प्रेसिडेंट कप’वर आपले नाव कोरले.

टेनिक क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ३१ मार्चपासून राष्ट्रीय स्तरावरील प्रेसिडेंट कप २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते या स्पर्धेचा दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ झाला. देशातील १६ विविध राज्यातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विविध साखळी सामन्यातून बिहार आणि उत्तरप्रदेश हे संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अखेर चुरशीच्या सामन्यात बिहार ब्लास्टार्स संघाने विजय मिळवला.

या सांगता समारंभाला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली, तर अंतिम सामन्यापूर्वी जागतिक कीर्तीचे ड्रम वादक शिवमणी यांनी पुणेरी ढोलच्या साथीने सादर केलेल्या जुगलबंदीने संपूर्ण स्टेडियम मंत्रमुग्ध झाले. या सादरीकरणामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.

यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेच्या यशाचा आनंद व्यक्त करत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. टेनिस क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि जास्तीत जास्त खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘प्रेसिडेंट कप’ आता वर्षातून तीन वेळा आयोजित केला जाणार आहे. या मालिकेतील दुसरे पर्व येत्या नोव्हेंबर महिन्यात पार पडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विजेत्या बिहार ब्लास्टर्स संघाचे अभिनंदन करतानाच, डॉ. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे आणि आयोजक समितीच्या नियोजनाचे कौतुक केले. क्रीडा रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

१ कोटी रुपयांचे भव्य पारितोषिक

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे बक्षीस स्वरूप अत्यंत भव्य ठेवण्यात आले आहे. विजेत्या संघाला १ कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला ५० लाख रुपये इतकी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आले.ग्रामीण भागातील आणि टेनिस क्रिकेटमधील गुणवान खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळून त्यांना प्रेरणा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती :-

या सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉ. उदय सामंत, मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, विधान परिषदेच्या माजी उपसभापती निलम गोऱ्हे, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अंडर १९ भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू हार्ले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र झोन एकचे अध्यक्ष अभिजित दरेकर यांच्यासह फेडरेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

विजेते :-

प्रेसिडेंट कप विजेते – बिहार प्लास्टर्स

उपविजेते – युपी नाईट्स

सर्वोत्कृष्ट फलंदाज – केतन म्हात्रे, महाराष्ट्र वॉरियर्स

सामनावीर – विशाल सिंग, बिहार ब्लास्टर्स

मालिकावीर – मोहित स्टार्क

सर्वोत्कृष्ट गोलंदाज – सुरेंदर सैनी, राजस्थानी योद्धास

सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – सरताज अली

हॅटट्रीक  – पंकज पार्थ बिहार प्लास्टर्स

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृणाल पांड्याची मुलाखत: ‘देशासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीही नाही’ – RCB स्टारने भारताचे स्वप्न पूर्ण...

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कृणाल पांड्या (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) बेंगळुरू: सुमारे 15 वर्षांपूर्वी, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पालेज या छोट्याशा गावात मॅटिंग विकेटवर, एका दुबळ्या...

सोहराब ‘बनावट चकमक’ प्रकरणात 21 पोलिस आणि नागरिकांची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाने कायम...

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील २१ पोलीस अधिकारी आणि २००५ च्या सोहराबुद्दीन शेख 'बनावट चकमक' प्रकरणातून एका...

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, महाराष्ट्रातील एका दिवसातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

पश्चिम बंगालचे मतदान, लग्नाचा हंगाम यामुळे पुण्यातील रेस्टॉरंट्स, उद्योगांमध्ये कामगारांची गर्दी

पुणे: पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीय राज्यांमधून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात मजुरांच्या तुटवड्याचा सामना...

नाल्याच्या तपासणीने बीएमसीमध्ये भाजप आणि सेनेमधील फॉल्ट लाइन उघडकीस आणली

मुंबई: उपमहापौर आणि शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह भाजप नेत्यांवर शहरभर सुरू असलेल्या पावसाळ्याच्या तयारीच्या पाहणीदरम्यान सेना सदस्यांना...

error: Content is protected !!