Homeशहरसामुदायिक आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम २०२६ संपन्न

सामुदायिक आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम २०२६ संपन्न

उल्हासनगर दि ४ : उल्हासनगर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल ( एन डी आर एफ ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल ( एन डी आर एफ ) यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम २०२६  चे आयोजन केले होते. उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ३ परिसरातील सिंधू भवन सभागृह येथे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या  कार्यक्रमास  श्रीमती डॉ अनिता जवंजाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , प्रशांत कुमावत, निवासी नायब तहसीलदार उल्हासनगर, सुरेंद्र पुनिया, निरीक्षक एन डी आर एस, सतीश सिंग, पीएसआय एसडिआरएफ. विशाल कदम, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन,गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती – २ , श्रीमती सलोनी निवकर,  सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती, सुरेश बोंबे, मुख्य अग्निशमन अधिकारी, यशवंत सगळे, सुरक्षा अधिकारी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पवार, उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि राजेश घनघाव यांनी केले. तसेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी म्हणून एनसीसी व एनएसएस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.ज्यातून तरुणांमध्ये आपत्ती व्यवस्थापना विषयी असलेली जागरूकता आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसून आली.

प्रशिक्षणादरम्यान, सहभागींना आग, भूकंप आणि पूर यांसारख्या आपत्ती प्रतिबंध तंत्र, प्रथमोपचार, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि मदत कार्यांबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी प्रात्यक्षिक सरावाद्वारे वास्तविक परिस्थिती हाताळण्याचा सरावही केला. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शक्य तितके सहभागी होऊन स्वतःची आणि समाजाची सुरक्षा सुनिश्चित करावी, जेणेकरून कोणत्याही आपत्तीच्या वेळी जीवित आणि मालमत्तेची हानी कमीत कमी येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंदुकीसह पकडलेल्या डिलिव्हरी मॅनकडून 8 पिस्तुले जप्त करण्यात आली

पुणे : पिंपरी येथे 29 एप्रिल रोजी बंदुकासह डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आणखी आठ देशी बनावटीची पिस्तुले आणि...

शासनाच्या देखरेखीशिवाय मेड प्रवेश फेरी रद्द करण्याची महा योजना आहे

मुंबई: महाराष्ट्रातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या पद्धतीत मूलभूतपणे बदल करू शकतील अशा हालचालीमध्ये, राज्य सीईटी सेलने वादग्रस्त संस्थात्मक फेरी काढून...

दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण, न्याय आणि अंतहीन प्रतीक्षा: डेटा

पुणे : महाराष्ट्रात दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे राज्यातील 2023 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हे फक्त नोंदवलेले आकडे आहेत....

IPL संघांना 220+ स्कोअर रूढ झाल्यामुळे घरचा फायदा नाहीसा झाला आहे असे का वाटते

SRH सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली : या आयपीएलमध्ये 220 पेक्षा जास्त धावा होणे अपरिहार्य वाटते. त्याचा...

KL राहुलचे बंगळुरूतील घर हे क्रिकेटच्या यशावर आणि मजबूत कौटुंबिक मुळे बांधलेले करोडो किमतीचे...

केएल राहुल हा कदाचित भारतीय संघातील सर्वात विश्वासार्ह आणि स्टायलिश क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी या खेळाडूने कठोर परिश्रम केले...

error: Content is protected !!