Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेला “१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत कामगिरी...

उल्हासनगर महानगरपालिकेला “१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत कामगिरी पुरस्कारात तृतीय क्रमांक: मुख्यमंत्री यांच्या हस्ते आयुक्त सन्मानित

उल्हासनगर, दि. २८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या “१५०  दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामगिरी मूल्यांकनात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्त मा. सौ. मनीषा आव्हाळे यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राज्यातील विविध महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा प्रभावी वापर, नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा पुरवणे, तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम बनवणे या उद्देशाने “१५०  दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” राबविण्यात आली होती.

उल्हासनगर महानगरपालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबवत ऑनलाइन सेवा वितरण, मालमत्ता कर व पाणी बिलांचे डिजिटल भरणे, तक्रार निवारणासाठी आधुनिक प्रणाली, तसेच विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम केले आहे. या सर्व बाबींमुळे महानगरपालिकेची कामगिरी राज्यस्तरावर विशेष ठरली. विशेष म्हणजे, सन २०२५ मध्ये देखील उल्हासनगर महानगरपालिकेने मुख्यमंत्री यांच्या “१००  दिवस कार्यालय सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या सलग यशामुळे महानगरपालिकेची कार्यक्षमता व प्रशासनातील सातत्यपूर्ण सुधारणा अधोरेखित होत आहे.

या यशाबद्दल आयुक्त सौ. मनीषा आव्हाळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, “ही कामगिरी संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. ‘१५०  दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम’ यशस्वीपणे राबविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यापूर्वी ‘१०० दिवस कार्यालय सुधारणा कार्यक्रम’ मध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकानंतरही आम्ही सुधारणा सुरू ठेवली असून, भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले. महानगरपालिकेच्या या यशामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार व डिजिटल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे

नवी दिल्ली: जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असूनही विराट कोहलीने “इम्पोस्टर सिंड्रोम” या आजाराशी झुंज देण्याबाबत खुलासा केला आहे. बेंगळुरू येथे आरसीबी...

इंधन दरवाढीचा परिणाम शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे

बेला जयसिंघानीमुंबई : मंगळवारच्या ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.५९ रुपये आणि डिझेल ९४.०८ रुपये झाले असून, गेल्या चार दिवसांतील एकत्रित...

मनुष्य दुर्मिळ फिस्टुला स्थितीतून बरा होतो ज्यामुळे तो पाण्यावर गुदमरतो

ट्रेकीओ-एसोफेजियल फिस्टुला स्पष्ट करणारे उदाहरण पुणे : सतत खोकला आणि पाण्यावर गुदमरल्यासारखे काही दिवस राहिल्यानंतर, एका 32 वर्षीय पुरुषाला ट्रेकीओ-एसोफेजियल फिस्टुला असल्याचे निदान...

जिममध्ये तास न घालवता टोन्ड हात हवे आहेत? अनंत अंबानींचे फिटनेस कोच म्हणतात की...

चार मिनिटांच्या वर्कआउटमध्ये काहीतरी विचित्रपणे प्रामाणिक आहे. कोणतीही फॅन्सी आश्वासने नाहीत. कोणतेही नाटकीय दावे आधी आणि नंतर. फक्त घाम येणे, धाप लागणे...

विरोधकांना आणि शेतकऱ्यांना आता शेती कर्जमाफी हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला डोळेझाक म्हणा

आमदार अंबादास दानवे आणि इतर शिवसेनेचे (UBT) पदाधिकारी कांद्याच्या भाववाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांमध्ये सामील झाले. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची...

error: Content is protected !!