उल्हासनगर दि २४ : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण आरोग्य कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश देशातून क्षयरोग (TB) पूर्णपणे निर्मूलन करणे हा आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त (आरोग्य) तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य द्रवारे- मोफत औषधोपचार, निक्षय पोषण योजना (रुग्णांना आर्थिक/पोषण मदत) तसेच Nikshay Mitra द्वारे सहाय्य जनजागृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले व व्याख्याने तसेच शाळांमध्ये पोस्टर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.,

कार्यक्रमादरम्यान निक्षय मित्रांच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांना पोषणयुक्त अन्नधान्य किट (Food Baskets) चे वितरण करण्यात आले. ग्रासिम इंडस्ट्रीज लि. युनिट सेंच्युरी रेयॉन, ‘शाहाड यांनी त्यांच्या CSR निधीतून १०० क्षयरोग रुग्णांना ६ महिन्यांसाठी दत्तक घेतले असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय महापौर, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यानंतर आशा सेविका व NTEP कर्मचारी यांच्या सहभागाने उल्हासनगर महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून रोटरी मिडटाउन हॉल, पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच, उल्हासनगर-३ येथील CHM कॉलेज परिसरातील वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी व कर्मचारी वर्गासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून “क्षयरोग मुक्त भारत” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.





























