Homeशहरगोवा राज्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला ई चलानच्या मेसेज...

गोवा राज्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला ई चलानच्या मेसेज वरून उल्हासनगरात वाहतूक पोलिसाने पकडले

  • चोरीची मोटरसायकल हस्तगत
  • आरोपीवर विविध स्वरूपाचे एकूण २६ गंभीर गुन्हे दाखल
  • ८ ते १० गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी )  : कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या एका इसमाची गोवा राज्यातून मोटरसायकल चोरी करून ती उल्हासनगरात नो पार्किंगच्या ठिकाणी घेऊन उभ्या असलेल्या एका तरुणावर वाहतूक विभागाच्या पोलिसाने  कारवाई केली. पण त्या नो पार्किंगच्या ई-चलानच्या मेसेजवरून ती मोटरसायकल चोरीच्या असल्याचे समजताच वाहतूक पोलीस व वार्डन यांनी एक तासातच त्या मोटरसायकल चोराचा शोध घेऊन त्याला झडप घालून ताब्यात घेतली. त्यात वाहतूक पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाला असून पकडण्यात आलेला मोटरसायकल चोर हा सराईत गुन्हेगार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शहर वाहतूक उपशाखा उल्हासनगर येथे पोलीस हवालदार संतोष बाळाराम भोईर हे कार्यरत आहेत. गुरुवारी ते व त्यांचे सहकारी वार्डन बबन उज्जैनकर बिर्लागेट ते दत्तवाडी रोडवर नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांवर कलम १२२  / १७७  प्रमाणे कारवाई करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार संतोष भोईर यांनी एका स्प्लेंडर प्लस मोटरसायकलवर नो पार्किंगची कारवाई करून ते वाहतूक कार्यालयात आले.

काही वेळातच वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे येथे पोलीस पोलीस हवालदार मोगरे यांनी फोन द्वारे माहिती प्राप्त झाली की उल्हासनगरात पोलिस हवालदार संतोष भोईर यांनी दुपारी दोन सव्वादोन च्या सुमारास ज्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलवर नो पार्किंगचे ई-चालान द्वारे कारवाई केली होती. त्याचा ओटीपी कोल्हापूर येथे राहणाऱ्या एका इसमाला गेला असून तो त्या मोटरसायकलचा मालक आहे. त्याची ती मोटरसायकल गोवा राज्यातून चोरीला गेले असल्याचे व त्याने पोलिसांना माझी मोटरसायकल ताब्यात घेण्यास सांगितले अशी माहिती पोलीस हवालदार मोगरे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संतोष भोईर यांना दिली. भोईर यांनी त्वरित त्यांचे सहकारी वॉर्डन बबन उज्जैनकर यांना घेऊन ते उल्हासनगर कॅम्प नंबर – १ येतील अंबिका देशीबारच्या समोर शिवरोड येथे गेले व ज्या मोटरसायकलवर त्यांनी नो पार्किंगची कारवाई केली होती त्या मोटरसायकलचा शोध घेतला. त्यावेळी ती मोटरसायकल तो तरुण घेऊन जात असताना पोलिसांनी दिसला. पोलिसांना पाहून त्या तरुणांनी मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून तो पोलीस लाईनच्या दिशेने मोकळ्या जागेत पळू लागला. पोलीस हवालदार संतोष भोईर व वार्डन  बबन उज्जैनकर यांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्या तरुणाने खाली पडलेली एक प्लास्टिकची खुर्ची उचलून पोलीस हवालदार संतोष भोईर यांच्या कपाळावर फेकून मारल्याने यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली. तरी देखील त्यांनी त्याचा पाठलाग करून उज्जैनकर यांच्या मदतीने त्या तरुणाला मोटरसायकल सह ताब्यात घेतले. भोईर यांनी त्वरित मदतीसाठी ठाणे अंमलदारांना फोन करताच त्वरित पोलीस हवालदार पांढरे, काळे ,चित्ते त्या ठिकाणी तातडीने येऊन त्या तरुणाला मोटर सायकल सह ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव सोन्या उर्फ लक्ष्मण उर्फ आदित्य घुडे (३० ) असून तो मुरबाड तालुक्यातील सरळगाव, किन्हवली इथला राहणार आहे. त्याने कोल्हापूर येथे राहणारे ओंकार भरडे यांची ती मोटरसायकल गोवा राज्यातून चोरी केले असल्याचे तपासात समजले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोन्या उर्फ लक्ष्मण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी त्याच्या संदर्भात अधिक चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना समजले आहे. त्याच्याविरुद्ध जवळपास, कीन्हवली पोलीस ठाणे, मुरबाड पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, वाडा पोलीस ठाणे व सेंट्रल पोलीस ठाणे या ठिकाणी  २६ गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असून जवळपास ८  ते १०  गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून नो पार्किंगच्या ई चालन मशीन द्वारे मोटरसायकल चोरीचा गुन्हा अवघड आल्याने व त्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला उल्हासनगर शहर वाहतूक उपशाखा विभागाचे पोलीस हवालदार संतोष भोईर व वार्डन बबन उज्जैनकर यांनी पकडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी त्या दोघांचे कौतुक करून त्यांना शाब्बासकी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात रिक्त जागा भरण्यासाठी बीएमएस, बीबीएसाठी सीईटीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत

मुंबई: बीएमएस, बीबीए, बीसीए आणि एकात्मिक एमबीए सारख्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी-आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी, राज्य सरकारने रिक्त जागा आणि प्रक्रियेतील...

वाढीव प्रवेश परीक्षेच्या शुल्कावरून एसपीपीयूमध्ये विद्यार्थी संघटनेने संप सुरू केला आहे

पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने बुधवारी एसपीपीयूमध्ये प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे, अतिरिक्त क्रेडिट कोर्सेस ऐच्छिक केले जावे...

उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची निवड : शिवसेनेचे मानले आभार

उल्हासनगर दि २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी महासभेत...

आयपीएल: एमआयने डॅनिशचा प्रभाव उप म्हणून वापरल्यानंतरही शार्दुल ठाकूर फलंदाजीला का आला – स्पष्टीकरण

शार्दुल ठाकूर गुरुवारी आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजीसाठी आला.विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूर मुंबईच्या...

अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी लखनौमधील शीर्ष 5 उच्चभ्रू निवासी परिसर

अलीगंज हा एक प्रस्थापित परिसर आहे आणि त्यात मध्यवर्ती निवासी मालमत्ता आहेत ज्यांना चांगले कनेक्शन आणि सहज प्रवेश मिळतो. हा परिसर बाजारपेठेपासून शैक्षणिक संस्था,...

error: Content is protected !!