Homeशहरगुढी पाडव्याच्या शोभायात्रेत विकास प्रकल्पांचा चित्ररथ ठरला प्रमुख आकर्षण

गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत विकास प्रकल्पांचा चित्ररथ ठरला प्रमुख आकर्षण

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून चित्ररथ

चित्ररथात विविध विकास प्रकल्पांची हुबेहूब प्रतिकृती

 डोंबिवली  दि.१९ : –  गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या उत्साहात डोंबिवली शहर आज रंगून गेले. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ साकारण्यात आले होते. मात्र यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचे दर्शन घडवणारा खास चित्ररथ नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे प्रतिबिंब या चित्ररथातून अत्यंत देखण्या पद्धतीने साकारण्यात आले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची झलक दाखवणारा हा चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या चित्ररथामध्ये वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम देणाऱ्या डबल डेकर मार्ग प्रकल्पाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. खालच्या स्तरावर रस्ता आणि फ्लायओव्हर तर वरच्या स्तरावर धावणारी मेट्रो अशी कल्पक मांडणी यात साकारण्यात आली होती. भविष्यातील आधुनिक वाहतूक व्यवस्थेची झलक या प्रतिकृतीतून पाहायला मिळाली.

तसेच खिडकाळी येथील प्राचीन श्री शिव मंदिराची आकर्षक प्रतिकृती देखील साकारण्यात आली होती. या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या राबविण्यात येत असून धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या या परिसराला नवे स्वरूप मिळणार आहे. याचबरोबर उल्हासनगर येथे उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशलिटी कॅशलेस हॉस्पिटलची प्रतिकृती देखील या चित्ररथात साकारण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून, सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवेचे हे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे.

क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या ह. भ. प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाची प्रतिकृती देखील यात उभारण्यात आली होती. ठाणे जिल्हा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणारे हे भव्य क्रीडा संकुल उभारले जात आहे. तसेच बेतवडे येथे उभारण्यात येत असलेल्या आगरी-कोळी वारकरी भवनाची प्रतिकृती देखील या चित्ररथात साकारण्यात आली. समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असून, त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर विकासकामांचे दर्शन घडवणारा हा चित्ररथ नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत या चित्ररथामागील संकल्पना आणि मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि वेगवान विकास घडवून आणण्याच्या दिशेने सुरू असलेल्या कामांची ही झलक असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: केएल राहुल एमएस धोनीला मागे टाकण्यासाठी सज्ज, त्यासाठी 13 धावांची गरज आहे…...

केएल राहुल एमएस धोनीला मागे टाकण्याच्या तयारीत आहे KL राहुल आयपीएल इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे कारण त्याला आज रात्री पंजाब...

लक्झरी लिव्हिंगसाठी ठाण्यातील टॉप 5 पॉश क्षेत्रे

माजिवडा हे एक प्रमुख निवासी ठिकाण आहे जे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर असलेल्या मोक्याच्या स्थितीसाठी ओळखले जाते. हे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देते आणि विवियाना आणि कोरम...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

लैंगिक छळ केल्याप्रकरणी पुरुषाला अटक

मुंबई: आग्रीपाडा पोलिसांनी गुरुवारी एका २४ वर्षीय तरुणाला १९ वर्षीय महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी, तिचे अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्याशी लग्न करण्यास सांगितल्याप्रकरणी...

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले, एल निनोच्या चिंतेने 2027 साठी...

पुणे: जिल्हाधिकारी आणि पुणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र दुडी यांनी शुक्रवारी एल निनोचा संभाव्य परिणाम आणि सामान्यपेक्षा कमी पावसाचा संभाव्य परिणाम...

error: Content is protected !!