Homeशहरमहापालिका आयुक्त स्वतः मैदानात : मालमत्ता कर भरण्याचे नागरिकांना केले आवाहन

महापालिका आयुक्त स्वतः मैदानात : मालमत्ता कर भरण्याचे नागरिकांना केले आवाहन

  • लोकअदालतच्या पार्श्वभूमीवर अभय योजनाजाहीर
  • पाणीपट्टी थकबाकीवरील शास्तीमध्ये १००% सूट

उल्हासनगर दि १३ :  शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी  दिनांक १३ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी स्वतः शहरात विविध ठिकाणी फिरून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता ‘जप्ती’ सारखी कठोर कायदेशी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

यावेळी आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) त्यांनी गोल मैदान, उल्हासनगर-१, कृषी विभाग कार्यालय, उल्हासनगर-४, गुरूनानक शाळेजवळ, उल्हासनगर-४ येथील किऑस्क सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन किऑस्क सेंटरवर सुरू असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली आणि थकीत कर वसुलीला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिले. राष्ट्रीय लोकअदालतीचे औचित्य साधून पाणी पुरवठा विभागाने सन २०२५-२६ करिता विशेष सवलत जाहीर केली आहे. थकबाकीसह चालू मागणीचा एकरकमी भरणा केल्यास विलंब शास्तीवर (Penal Interest) १००% सूट देण्यात येईल. ही योजना घरगुती आणि बिगर-घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या नळजोडणी धारकांसाठी लागू आहे. सदर योजना केवळ १३ मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या चार दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल.

या आवाहनात्मक मोहिमेत आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या  सोबत उपआयुक्त श्रीम. विशाखा मोटघरे, कर निर्धारक व संकलक श्रीम. निलम कदम, सहा. आयुक्त गणेश शिंपी, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, कर निरीक्षक व वसुली लिपिक सहभागी झाले होते.

“नागरिकांनी जप्तीसारखी कठोर कारवाई टाळण्यासाठी आणि शास्ती माफीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपली पाणीपट्टी व मालमत्ता कर त्वरित जमा करावा. आपल्या कराचा पैसा हा शहराच्या दर्जेदार सोयी-सुविधांसाठीच वापरला जातो. सहकार्य करा आणि जबाबदार नागरीक बना”, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल 2026 | हार्दिक पांड्या केकेआरच्या लढतीत परतण्याची शक्यता आहे, मुंबई इंडियन्स संघातील सहकारी...

हार्दिक पंड्या (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) " decoding="async" fetchpriority="high"/>हार्दिक पांड्या (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली : हार्दिक पांड्या कधी परतणार? त्याची दुखापत किती...

मध्य रेल्वेवर 1,300 हून अधिक दलालांना अटक, 43 लाख रुपयांची दारू जप्त

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते मुंबई: मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) 1300 हून अधिक...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

सारा अली खानचे घर एका कलाकाराचे निवासस्थान आहे: 5 कला प्रेरणा ज्या तुम्ही काढून...

सारा अली खान तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “पति पत्नी और वो दो” या चित्रपटाने सर्वांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे, तिच्या व्यक्तिमत्त्वाने जो उबदार,...

पीसीएमसी झोन ​​कार्यालये 8 ते 10 पर्यंत वाढवते लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या विभागीय कार्यालयांची संख्या सध्याच्या आठ वरून 10 पर्यंत वाढवली आहे, सुमारे चार महिन्यांनी भाजपचे स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी...

error: Content is protected !!