उल्हासनगर दि.२५ ( प्रमोद दळवी ) : कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांची सदिच्छा भेट घेतली व शहरातील अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी संविधानाच्या उद्देश्यिकेची फ्रेम असरोंडकर यांनी महापौरांना भेट दिली आणि त्यांना फातिमाबी – सावित्री उत्सवाचं आमंत्रणही दिलं. मनपा प्रशासन, मनपा शाळा, भ्रष्टाचार, अतिक्रमणे, कंत्राटी कामगारांसहीत विविध विषयांवर चर्चा करताना नियम कायद्यांच्या चौकटीत आपला कारभार असावा, अशी अपेक्षा राज असरोंडकर यांनी व्यक्त केली. आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विशेष म्हणजे आंदोलनांची वेळ येऊ देणार नाही, असं महापौर अश्विनी निकम यांनी सांगितलं. कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक प्रफुल केदारे, ॲड. वनिता ओवळेकर, मनोज कोरडे, शिवाजी म्हस्के, प्रकाश भोसले, राहुल पाटील, संतोष भोईर आदी मान्यवर यावेळी सोबत होते.





























