Homeशहरलाडक्या बहिणीच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व देण्याचे काम उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झालेले ...

लाडक्या बहिणीच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व देण्याचे काम उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झालेले आहे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) :आज उल्हासनगर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर व उपमापौर यांची निवड प्रक्रिया पार पडली. या दोघांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरत येऊन महापौर पदी विराजमान झालेल्या अश्विनी कमलेश निकम  व उपमापौर अमर लुंड यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे .उल्हासनगर महानगरपालिकेत महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेले आहेत. शिवसेनेचे महापौर आणि भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर या दोघांचे मी खूप अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा देतो आणि महापौर पदी लाडकी बहीण या ठिकाणी विराजमान झालेली आहे. खास करून मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो तिला खूप शुभेच्छा देतो. लाडकी बहीण योजना तर सरकारने आणली पण आज लाडक्या बहिणीच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व देण्याचं काम जे आहे ते उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  म्हणाले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील महापौर पदाच्या महिला उमेदवार या शिवसेनेच्या आहेत. त्या देखील लाडकी बहीण आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचा गाडा देखील लाडकी बहीणच हाकणार आहे म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या सगळीकडे  लाडक्या बहिणीच्या हातात मध्ये जे नेतृत्व देण्याचं काम आज मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी केलेला आहे. असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  म्हणाले.

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महायुतीची ताकदमोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच या ठिकाणी महायुतीचा महापौर आणि उपमहापौर बसलेला आहे. महायुतीच्या माध्यमाने ज्या प्रकारे केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो, राज्यांमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांच्या नेतृत्व मध्ये आम्ही काम करतो.

आज या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीचे महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली आजपासूनचा कारभार जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे. मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो की उल्हासनगर साठी चांगल्या पॉलिसीच्या ठिकाणी घेऊन या, चांगल्या योजना या ठिकाणी घेऊन या, त्यांच्या मागे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी पूर्ण ताकदीने उभे राहून उल्हासनगर शहराला एक चांगलं शहर बनवण्याचा संकल्प तो आज या सभागृहामध्ये या दोघांनी घेतलेला आहे. असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल 2026 | ‘गुन्हेगारी निर्णय’: ऋषभ पंतला निकोलस पूरनला सुपर ओव्हरमध्ये केकेआरच्या पराभवाचा सामना...

ऋषभ पंत आणि निकोलस पूरन (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2026 मधील सामना एक...

नातेसंबंधातील ‘वितर्क शैली’ काय आहेत? त्यांना ओळखणे तुमचे बंध कसे मजबूत करू शकतात

डेटिंग ट्रेंड आणि ॲप्सने आधुनिक डेटिंग लँडस्केप पूर्णपणे बदलले आहे. ज्या दिवसांपासून एखाद्याने कबुतराला पत्र पाठवून त्यांचा जोडीदार काय करत आहे याबद्दल...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

महाराष्ट्र: फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग-2026 9 मे आणि 10 मे रोजी 10 लाख रुपयांच्या...

नवी मुंबई: फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग-2026 (BSL) लाँच करून महाराष्ट्रातील बॅडमिंटन एका नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे, ही एक फ्रँचायझी-आधारित लीग आहे...

बावधनमधील सात रस्ते गुदमरलेल्या अंडरपासकडे जातात

पुणे : बावधनमधील ओंकार गार्डन चौक अंडरपास येथे सात रस्ते, वाहतुकीचा खोळंबा.ट्रॅफिक सिग्नल नसणे आणि घटनास्थळी काही दिवसांपासून पोलिसांची उपस्थिती नसणे ही आणखी गुंतागुंतीची...

error: Content is protected !!