नाशिक दि.३( प्रमोद दळवी ) : विभागीय आयुक्त कार्यालय येथे वडार समाजाच्या विविध ज्वलंत मागण्यांसंदर्भात रेखाताई मंजुळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. समाजाच्या विशेष व प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे .
वडार समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी ठामपणे मांडण्यात आली. यावेळी बोलताना रेखाताई मंजुळकर यांनी समाजाला स्पष्ट आव्हान केले की, “चला, मी तर लढत आहे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी. आता तुम्हीही या लढाईत सामील व्हा. हा लढा आपल्या अस्तित्वाचा आणि पुढील पिढीच्या भविष्याचा आहे.” वडार समाजावर कुठेही अन्याय-अत्याचार झाला, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणारच, असा ठाम निर्धार रेखाताई मंजुळकर यांनी व्यक्त केला.
समाजाच्या विशेष व प्रलंबित मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे ठाम शब्दांत रेखाताई मंजुळकर यांनी सांगितले. दिनांक : १० फेब्रुवारी २०२६ रोजी ठिकाण : विभागीय आयुक्त कार्यालय येथे वडार समाजाच्या हक्कांसाठी उपोषण / आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संपूर्ण वडार समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही रेखाताई मंजुळकर यांनी दिला आहे.





























