उल्हासनगर दि . ०१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प नंबर -३ येथील, शांतीनगर स्मशानभूमीत बसवलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणावरुन हटवून तो सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा या मुख्य मागणीसाठी रविवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी कालिका कला मंडळ, मराठा सेंक्शन, उल्हास विद्यालयाजवळ, उल्हासनगर कॅम्प नंबर-४ येथे अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक अंत्यत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती .

या मिटिंगला आंबेडकरवादी संस्था-संघटना, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, समाजातील जागृत नागरिक उपस्थित होते. त्यवेळी ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले उल्हासनगर येथील शांतीनगर मधील स्मशानभूमीत विद्युत दहिनीसमोर भर स्मशानामध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वकृती पुतळा बसून बाबासाहेबांचा सन्मान झाला नसून हित पूर्वक अपमान केला गेला आहे. त्याबद्दल प्रगती पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत . स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाबत बैठक आयोजित केली होती .या बैठकीचं निमंत्रकत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर होते.उल्हासनगर मधील आंबेडकरवादी , प्रगतीक विचारांचे सर्वच कार्यकर्ते, नेते,पत्रकार, माजी नगरसेवक आधी या बैठकीला उपस्थित होते .आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची स्थापना केलेली आहे याचे मुख्य निमंत्रक दिलीप मालवणकर आहेत असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले .त्यावेळी स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात राज्य प्रशासनाला आणि महानगर पालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेट उद्या देणार आहोत. पंधरा दिवसात स्मशानभूमीतल्या पुतळ्याचे स्थलांतरण करून सन्मानानं बाबासाहेबांचा पुतळा सन्मान जनकरित्या योग्य ठिकाणी त्याला पुन्हा स्थापित करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले .
जर पालिका प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत तीव्र व्यापक आंदोलन उल्हासनगर शहरांमध्ये होईल असा इशारा दिला आहे. उल्हासनगरची कुठलीही आंबेडकर वस्ती, प्रागतीक, मराठा समाजाची वस्ती बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान सहन करणार नाही आणि आंदोलनामध्ये उतरेल आणि एक नव्या परवाला उल्हासनगर मध्ये सुरुवात होणार आहे. स्मशानात बसवलेला बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा पालिका प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत तो स्थलांतरित करावा या मागणीसाठी एका व्यापक आंदोलनाचा प्रारंभ आज पासून झालेला आहे असे ज्येष्ठ नेते श्याम गायकवाड यांनी सांगितले.





























