Homeशहरउल्हासनगरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र टोळक्यांचा दहशतवाद : रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड :...

उल्हासनगरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र टोळक्यांचा दहशतवाद : रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड : नागरिकांमध्ये घबराट

उल्हासनगर दि.२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प -५ मधील तानाजी नगर परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळीने अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवून तोडफोड केली. या हल्ल्यात ४ मोटरसायकली, २ रिक्षा, २  टेम्पोसह ८  ते १०  वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर पेट्रोल टाक्यांनी लक्ष करण्यात आले. या तोडफोडीमुळे  परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत हिललाईन  पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटना घडलेल्या ठिकाणावरील नागरिकांनी सांगितले ८  ते १०  जणांची टोळी रात्री बाराच्या सुमारास हातात तलवार व कोयते घेऊन आले होते. पण ते त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर पुन्हा साडेतीनच्या सुमारास परत येऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली.

गाडीच्या काचा फोडून व पेट्रोलच्या टाक्या ही फोडण्यात आल्या. त्यांनी त्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. अशा गुन्हेगारावर पोलिसांची वचक न राहिल्याने ते दहशतीचे वातावरण निर्माण करू लागले आहेत. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सशस्त्र टोळीने केलेल्या या तोडफोडीमुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. वेळीच पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई केली नाही तर असे प्रकार नेहमीच घडत राहतील असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026 च्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळाल्याने CSK ‘अधिक मजबूत युनिट’ म्हणून परत येईल...

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड म्हणाला की, सीएसकेला सोमवारी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला तरीही मला "मुलांचा...

मुंबईतील उद्योजकाची ओळखीच्या व्यक्तीने 7 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी फसवणूक केली आहे

मुंबई: एका विधवा उद्योजकाने तिच्या GST खात्यावर फसवणूक करून फसवणूक केल्याबद्दल आणि बनावट विक्री पावत्या सादर करून तिच्या कंपनीची 7 कोटी रुपयांपर्यंतची...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

भीती, स्वातंत्र्य आणि एड्रेनालाईन वाटण्यासाठी प्रवासी अधिक पैसे का देत आहेत; भारतात साहसी पर्यटनाचा...

अलिकडच्या वर्षांत प्रवासाच्या वर्तनात लक्षणीय बदल झाले आहेत. आराम, विश्रांती आणि विश्रांती महत्त्वाची असली तरीही, बरेच प्रवासी त्यांच्या सुट्ट्या फक्त आरामात घालवण्यात...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

error: Content is protected !!