उल्हासनगर दि.२ : दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर विठ्ठलवाडी व्यापारी पंचायत व विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील हमाल यांच्यावतीने लोकल ट्रेनची पूजा करण्यात आली. त्यावेळी मा. नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते मोटर मॅन व विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर व त्यांचे सहकारी स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला.






























