उल्हासनगर दि.२९ : नवरात्र उत्सवानिमित्त उल्हासनगरातील शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी जय भवानी मित्र मंडळ या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी आंबे मातेचे दर्शन घेऊन शहरातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि शहरात सुख शांतता आणि एकता नांदावी अशी प्रार्थना आंबे मातेकडे केली. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























