Homeशहरवंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूरमध्ये भव्य सभासद नोंदणी अभियान

वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूरमध्ये भव्य सभासद नोंदणी अभियान

उल्हासनगर दि.९ ( प्रमोद दळवी ): वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे मोठ्या उत्साहात सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या अभियानासाठी आकर्षक व सुसज्ज टेंट उभारण्यात आले होते. विविध वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नोंदणी केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभासद नोंदणी केली. विशेषतः महिलांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. अनेक भगिनींनी मोठ्या उत्साहाने नोंदणी करून परिवर्तनाच्या चळवळीला पाठिंबा दर्शविला. तसेच युवक, पुरुष आणि विविध घटकांतील नागरिकांनीही अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत वंचित बहुजन आघाडीच्या विचारांवर विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे संपूर्ण अभियानाला उत्सवाचे व जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. या यशस्वी अभियानामुळे ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळकटीला चालना मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आगामी काळातही राज्यभर अशाच पद्धतीने सभासद नोंदणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जस्टिन बीबर मॅडोना, शकीरा आणि BTS मध्ये सामील झाला ब्लॉकबस्टर फिफा विश्वचषक अंतिम हाफटाइम...

फुटबॉल, संगीत आणि सामाजिक प्रभाव पहिल्या-वहिल्या FIFA विश्वचषकाच्या अंतिम हाफटाइम शोमध्ये एकत्र येतील. (एएनआय फोटो) FIFA विश्वचषक 2026 ची अंतिम फेरी फुटबॉलच्या पलीकडे...

16 ऑगस्टपासून व्यावसायिक चालकांसाठी मराठी सक्ती : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक | मुंबई...

प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य परिवहन विभागाने ८ जुलै रोजी अधिसूचना जारी केली होती. मुंबई : महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांच्या चालकांना मराठीत बोलणे बंधनकारक...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

पावसाळ्यातील शू हॅक: पावसाळ्यात ओले शूज जलद सुकवण्याचे ७ सोपे मार्ग

ओले शूज अति तापमानात उघडे पाडणे, जसे की त्यांना सूर्यप्रकाशाखाली, हीटरजवळ ठेवणे किंवा जास्तीत जास्त उष्णतेवर हेअर ड्रायर वापरणे, शूज खराब करू शकतात. परिणामी,...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांना केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

error: Content is protected !!