Homeशहरराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला ) मोठा धक्का; अंबरनाथचे शहर अध्यक्ष सदाशिव...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला ) मोठा धक्का; अंबरनाथचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश

अंबरनाथ दि. ७: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अंबरनाथ शहर अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे सदाशिव पाटील यांनी मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी अधिकृतरित्या पक्ष त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत यांनी प्रवेश केला. विशेष म्हणजे, प्रवेशाच्या काही वेळातच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पाटील यांची अंबरनाथ शहर अध्यक्षपदी तातडीने नियुक्ती केली आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सदाशिव पाटील यांनी प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथचे माजी नगरसेवक सचिन पाटील, महिला आघाडी अध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.  पक्षप्रवेशानंतर लगेचच खासदार सुनील तटकरे यांनी सदाशिव पाटील यांना अंबरनाथ शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या पत्रात तटकरे यांनी म्हटले आहे की, “आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबरनाथ शहर ‘अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे.” तटकरे यांनी पाटील यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​सदाशिव पाटील यांना पुन्हा एकदा अंबरनाथ शहरात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. पाटील यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अंबरनाथमधील संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!