Homeशहरमालमत्ता कर पावती वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भत्ता द्या: 'एक हात...

मालमत्ता कर पावती वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भत्ता द्या: ‘एक हात मदतीचा’ संस्थेची उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे मागणी

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  :  यंदा पहिल्यांदाच मालमत्ता कर पावती वाटपाचे काम उल्हासनगर महानगरपालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले असून या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा  अशी मागणी ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष विजय द. कदम, उपाध्यक्ष रवी गो. वलेचा, सचिव अतुल म. शिंदे, उपसचिव करण उ. दराडे, खजिनदार जयेश वि. बेलदार व सल्लागार दत्तात्रय बा. कदम यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी मालमत्ता कर पावती वाटपाचे काम महिला बचत गटांमार्फत केले जाते व त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. परंतु यावर्षी हे काम महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी हे काम चोखपणे व योग्य प्रकारे करत आहेत. मात्र, हे काम करताना कर्मचाऱ्यांना गाडी भाडे, पाणी, जेवण यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने शारीरिक त्रासही होत आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी कोणतीही तक्रार किंवा अपेक्षा व्यक्त केलेली नाही.

‘आपली महानगरपालिका एक कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबाचे प्रमुख आहात. त्यामुळे याचा सकारात्मक विचार करून मालमत्ता कर भरणा पावती वाटपासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वखुशीने काहीतरी विशेष भत्ता देण्यात यावा  अशी विनंती ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या अतिरिक्त कामाची दखल घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल  अशी अपेक्षा देखील  ‘एक हात मदतीचा’ संस्थेने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!