Homeशहरमाथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेला नवी मुंबईमधील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेला नवी मुंबईमधील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

  • पाण्यात बुडत असणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी दोघांनीही गमावले प्राण

 माथेरान दि १६ ( प्रमोद दळवी ) : माथेरान मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. माथेरान मध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या नवी मुंबईतील तिघांचा माथेरान मधील शार्लेट लेकच्या तलावात बुडून दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई मधील कोपरखैरणे परिसरातील एका महाविद्यालयामधील काही विद्यार्थी माथेरान मध्ये पावसाळी पर्यटनासाठी आले होते. त्यातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रविवारी सायंकाळी माथेरान मधील शार्लेट लेकच्या ठिकाणी हे तरुण मंडळी मोजमजा करीत होते. त्यावेळी यातील एका तरुणाचा पाय घसरला. त्यावेळी दोघांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तिघेही खोल पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माथेरान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेचार च्या सुमारास नवी मुंबई मधील कोपरखैरणे परिसरातील एका कॉलेजचे दहा विद्यार्थी पर्यटनाकरिता माथेरान मध्ये आले होते. शार्लेट लेक येथे लेक पॉइंट फिरत असताना त्यापैकी एक जण पाण्याजवळ पाय धुण्यासाठी गेला. पण त्याचा  पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. तो बुडत असताना इतरांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न करत असताना त्यापैकी आणखीन दोन जण पाण्यामध्ये गेले. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले व इतर वाचले. ज्यावेळी ते तिघेही पाण्यात बुडाले तेव्हा या घटनेची खबर त्या विद्यार्थ्यांनी माथेरान पोलिसांना दिली. माथेरान पोलिसांनी माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमला मदती साठी बोलावलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिघांची शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर त्या तिघांचेही मृतदेह त्यांच्या हाती लागले. या दुर्घटनेमुळे माथेरानमध्ये एकच शोककळा पसरली आहे. पाण्यात बुडून मृत्यू झालेले ते तिघेही महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसी कारवाईच्या चौकशीची मागणी; सर्वपक्षीय एकता समितीकडून उपविभागीय अधिकारी व...

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी )  : जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिसी कारवाईची उच्चस्तरीय व निष्पक्ष...

कॉमनवेल्थ गेम्स 2026 लाइव्ह अपडेट्स: पदकांवर लक्ष केंद्रित करणे, बॉक्सिंग, पोहणे, जिम्नॅस्टिक्स आणि बरेच...

कॉमनवेल्थ गेम्स 2026 लाइव्ह अपडेट्स: 24 जुलै रोजी 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा व्यस्त आणि संभाव्य फायद्याचा दिवस असेल, ज्यामध्ये सहा खेळांमध्ये कृती पसरली आहे...

‘पुरुष आंदोलकाला धरून ठेवण्याचा प्रयत्न’: मुंबई पोलिसांचे व्हायरल CJP निषेध व्हिडिओ स्पष्टीकरण, महिलेसोबत गैरवर्तनाचे...

मुंबई पोलिसांनी एक अधिकारी आणि महिला आंदोलक दर्शविणाऱ्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण जारी केले (चित्र क्रेडिट्स: X). मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या...

एक कुटुंब, अनेक बीएलओ: मतदार कागदोपत्री पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने गर्दी करतात | पुणे...

आम्ही बीएलओंच्या भेटीची प्रतीक्षा करावी की त्यांच्याशी संपर्क साधावा? मुदत जवळ आल्याने मतदार संभ्रमात आहेतकोंढव्यात लग्नसोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लॉनच्या आवारात एसआयआर व्यायामासाठी...

मान्सून गार्डनिंग टिप्स: या पावसाळ्यात हिरवीगार बाग हवी आहे का? ही 7 वेगाने वाढणारी...

या पावसाळ्यात हिरवीगार बाग हवी आहे का? थंड तापमानाबरोबरच, पावसाळ्यात बागकामासाठी सर्व आवश्यक परिस्थिती उपलब्ध होते कारण हवेतील आर्द्रता जास्त असते आणि जमिनीत...

error: Content is protected !!